Jump to content

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर
आहसंवि: NAGआप्रविको: VANP
NAG is located in महाराष्ट्र
NAG
NAG
नागपूर विमानतळाचे महाराष्ट्रातील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ नागपूर
समुद्रसपाटीपासून उंची १,०३३ फू / ३१५ मी
गुणक (भौगोलिक)21°05′32″N 079°02′50″E / 21.09222°N 79.04722°E / 21.09222; 79.04722
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
फूमी
०९/२७ ६,३५८ १,९३८ डांबरी धावपट्टी
१४/३२ १०,५०० ३,२०० डांबरी धावपट्टी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: NAGआप्रविको: VANP) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर येथील विमानतळ आहे. याचे मुळचे नाव सोनेगांव विमानतळ आहे. हे महाराष्ट्रातील १८ विमानतळांपैकी एक आहे. येथून मुंबईदिल्लीसह भारतातील अनेक मोठी शहरे तसेच शारजा, दुबई आणि दोहा येथे विमाने जातात-येतात.

नागपूर विमानतळावर नुकतीच इंड्रा ही रडार प्रणाली लावण्यात आली आहे. अशी प्रणाली लागणारे हे भारतातील पहिला विमानतळ आहे. नागपूरच्या आकाशातून दररोज सुमारे ६५० विमानांची ये-जा असते.[]

या विमानतळास, भारताच्या नागरी उड्डयन महासंचालक कार्यालयाद्वारे नुकताच संकेत 'ई' (कोड-ई) हा दर्जा देण्यात आलेला आहे. याद्वारे बोईंग ७७७, बोईंग ७४७, बोईंग ७८७ या श्रेणीची महाकाय विमानेही येथे उतरू शकतील. येथे एर इंडियाचा एमआरओ (?) देखील तयार झाला आहे.[]

विमानसेवा व गंतव्यस्थान

विमान कंपनीगंतव्य स्थान .
एर अरेबियाशारजा
एर इंडियादिल्ली, मुंबई
इंडिगोदिल्ली, मुंबई, कोलकाता, पुणे, बंगळूर, चेन्नई, कोची, हैदराबाद , इंदोर
गोएरदिल्ली, मुंबई, अहमदाबाद, पुणे, बंगळूर
कतार एरवेझदोहा

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ टाइम्स ऑफ इंडियातील लेख[permanent dead link] दि.१६/१०/२०१३ रोजी १६.५० वाजता जसे दिसले तसे.
  2. ^ तरुण भारत, नागपूर ,ई-पेपर,आपलं नागपूर पुरवणी पान क्र. ११ नागपूर विमानतळावर एरफिल्ड क्रॅश फायर टेंडर Check |दुवा= value (सहाय्य). २०१७-०२-०९ रोजी पाहिले.

बाह्य दुवे