Jump to content

डॉ. आंबेडकर नगर

  ?डॉ. आंबेडकर नगर
(महू)


मध्य प्रदेश • भारत
—  गाव  —
Map

२२° ३३′ ००″ N, ७५° ४५′ ३६″ E

प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरइंदूर
जिल्हाइंदूर
लोकसंख्या८५,०२३ ([[इ.स. २०११[]|२०११[]]])
भाषाहिंदी
भीम जन्मभूमी स्मारक, महू

डॉ. आंबेडकर नगर[], जूने नाव: महू, ही भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील इंदूरजवळ एक लष्करी छावणी आहे. 'महू' हे नाव इंग्रजी MHOW (MHOW – मिलिटरी हेडक्वार्टर्स् ऑफ वॉर) वरून आले. हे शहर इंदूर जिल्ह्यामध्ये येते. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला होता. त्यांचे वडील रामजी आंबेडकर हे येथे सैनिकी शिक्षक पदावर कार्यरत होते. येथे भीम जन्मभूमी स्मारक आहे. सन २००३ मध्ये मध्य प्रदेश सरकारने महूचे नाम बदलून "डॉ. आंबेडकर नगर" असे ठेवले. येथील महू स्टेशन रेल्वे स्थानकाचे नावही "डॉ. आंबेडकर स्टेशन" असे केले गेले. येथे बाबासाहेबांच्या सन्मानार्थ डॉ. बी.आर. आंबेडकर समाजशास्त्र विद्यापीठ स्थापन केलेले आहे.

भीम जन्मभूमी स्मारक

भीम जन्मभूमी हे महू (डॉ. आंबेडकर नगर) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाचे स्मारक आहे. १४ एप्रिल १८९१ रोजी लष्करी छावणी असलेल्या महू गावात बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला होता. येथे मध्य प्रदेश शासनाने भव्य स्मारक उभे केले आहे. या स्मारकाचे उद्घाटन १४ एप्रिल १९९१ रोजी १००व्या आंबेडकर जयंतीदिनी मध्य प्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांच्या हस्ते करण्यात आले. स्मारकाची रचना वास्तुविशारद ईडी निमगडे यांनी तयार केली. पुढे याचे १४ एप्रिल २००८ रोजी ११७व्या भीमजयंती दिनी लोकार्पण केले गेले. दरवर्षी येथे लाखो भीमानुयायी, बौद्ध व पर्यटक भेट देऊन बाबासाहेबांच्या जन्मस्थळाला वंदन करीत असतात.

हे सुद्धा पहा

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची

बाह्य दुवे

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ [१]
  2. ^ "Mhow city renamed as Dr Ambedkar Nagar". 2012-10-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-29 रोजी पाहिले.