डेव्हिड हॅसेलहॉफ
डेव्हिड मायकेल हॅसेलहॉफ (१७ जुलै, १९५२:बाल्टिमोर, मेरीलँड, अमेरिका - ), [१] तथा " द हॉफ ", [२] हा एक अमेरिकन अभिनेता आणि गायक आहे. दूरचित्रवाणीवर सर्वाधिक दिसलेला माणूस असा विक्रम गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याच्या नावावर आहे. [३] हॅसलहॉफने आपल्या कारकीर्दीची सुरुवात द यंग अँड द रेस्टलेस या दूरचित्रवाणी मालिकेत (१९७५-१९८२)) मध्ये डॉ. स्नॅपर फॉस्टरच्या भूमिकेने केली. यानंतर त्याला नाइट रायडरमधील (१९८२-८६) मायकेल नाइट आणि बेवॉच (१९८९-२०००) मधील एलए काउंटी जीवनरक्षक मिच बुकॅनन या भूमिकांद्वारे मोठे यश मिळाले.
हॅसलहॉफने डॉजबॉल (२००४), द स्पंज बॉब स्क्वेरपँट्स मूव्ही (२००४), क्लिक (२००६), हॉप (२०११), यांसह अनेक चित्रपटांतून भूमिका केल्या आहे. हॅसेलहॉफने मार्व्हेल कॉमिक्समधील निक फ्युरीची भूमिका सॅम्युअल एल. जॅक्सनच्या आधी साकारली होती.
संदर्भ
- ^ "David Hasselhoff Biography (1952–)". Filmreference.com. March 4, 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 4, 2010 रोजी पाहिले.
- ^ "New crab with hairy chest dubbed "The Hoff"". CBS News. January 5, 2012. January 4, 2014 रोजी पाहिले.
- ^ "Royal Wedding, Hugh Laurie and Johnny Depp make it into Guinness World Records 2012 edition". Guinness World Records (इंग्रजी भाषेत). September 1, 2011. July 29, 2020 रोजी पाहिले.