डेव्हिड रिकार्डो
डेव्हिड रिकार्डो (इ.स. १७७२ - इ.स. १८२३) हे एक ब्रिटिश अर्थतज्ञ होते. १८१७ साली प्रकाशित झालेल्या “प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी अँड टॅक्सेशन” (“राजकीय अर्थव्यवस्था व करव्यवस्थेची तत्त्वे”) या त्यांच्या पुस्तकासाठी ते ओळखले जातात. या पुस्तकात रिकार्डो यांनी तत्कालीन जमीनदारी व्यवस्थेची टीका केली. या व्यवस्थेत काही थोड्या जमीनदारांच्या हातात अधिकाधिक जमीन व संपत्ती येते व सामाजिक असमतोल उत्पन्न होतो असे रिकार्डो यांचे मत होते. हा असमतोल टाळण्यासाठी जमीनीवर कर बसवला जावा असे त्यांनी या पुस्तकात सुचविले. पुढे औद्योगिक क्रांतीमुळे जमीनदारी व्यवस्थाच नाहीशी झाली व रिकार्डो यांचे असमतोलाचे भाकीत खोटे ठरले. परंतु त्यांच्यानंतर कार्ल मार्क्स या जर्मन अर्थतज्ञाने हाच असमतोलाचा विचार औद्योगिक भांडवरदारीस लावला.