Jump to content

डेव्हिड डिऑप

डेव्हिड डिऑप
जन्म नाव डेव्हिड मॅंडेसी डिऑप
जन्मजुलै ९, १९२७
बोर्दो, फ्रांस
मृत्यू१९६०
डकार, सेनेगल
राष्ट्रीयत्वसेनेगाली
कार्यक्षेत्रसाहित्य
भाषाफ्रेंच
साहित्य प्रकारकविता
चळवळ नेग्रिट्यूड

डेव्हिड मॅंडेसी डिऑप (जुलै ९, १९२७:बोर्दो, फ्रांस - १९६०:डकार, सेनेगल)[] हे फ्रेंच भाषेचे सेनेगाली कवी होते. त्यांना मुख्यतः त्यांच्या मूळ आफ्रिकन लोकांच्या साहित्यिक चळवळीतील योगदानासाठी ओळखले जाते. त्यांच्या कवितांतून पाश्चात्य वसाहतवादाविषयीची चीड आणि आफ्रिकेच्या स्वातंत्र्याबद्दलचा आशावाद दिसून येतो.[][]

डेव्हिड डिऑप यांचा जन्म फ़्रान्समध्ये बोर्दो येथे झाला. त्यांचे वडील सेनेगाली, व आई कॅमेरूनिअन होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण सेनेगालात झाले. डेव्हिड डिऑप यांच्या काव्यरचनेची सुरुवात शालेय वयातच झाली. त्यांच्या कवितांचा समावेश लेओपोल्ड सेंघोर यांनी संपादलेल्या व फ्रेंच भाषेमधील आफ्रिकन साहित्यातला महत्त्वाचा टप्पा म्हणून पुढील काळात गणल्या गेलेल्या कवितासंग्रहामध्ये करण्यात आला.[].

डिऑप यांचा मृत्यू १९६० साली डकार येथे एका विमान अपघातात झाला.

संदर्भ

  1. ^ "David Diop".
  2. ^ "David Diop, France (1927-1960)". 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-12-31 रोजी पाहिले.
  3. ^ "David Diop: A Voice of Negritude".
  4. ^ "David Diop".