डेल्टा कनेक्शन
डेल्टा कनेक्शन ही डेल्टा एर लाइन्स या अमेरिकेतील विमानवाहतूक कंपनीची छोट्या शहरांतून विमानसेवा पुरवणारी शाखा आहे. या उपकंपनीची स्वतःची विमाने नसून ती अनेक छोट्या प्रादेशिक विमानकंपन्यांशी केलेल्या करारांद्वारा ही सेवा पुरवते. एंडेव्हर एर या डेल्टाच्या उपकंपनीची, तसेच कॉमएर, स्कायवेस्ट एरलाइन्स या विमानकंपन्यांची विमाने डेल्टा कनेक्शनचे नाव व रंगसंगती देऊन उडतात.