Jump to content

डेन्मार्कचा चौथा एरिक

चौथा एरिक (इ.स. १२१६ - ऑगस्ट ९, इ.स. १२५०) हा डेन्मार्कचा राजा होता. इ.स. १२४१पासून ते मृत्यूपर्यंत तो गादीवर होता.

डेन्मार्कचा दुसरा वाल्देमार व पोर्तुगालची बेरेंगारिया यांचा मुलगा असलेला एरिक, हा एबेल आणि पहिल्या क्रिस्टोफरचा भाऊ होता. याला एरिक प्लाउपेनी या नावानेही ओळखले जाते.