Jump to content

डेक्लिनेशन

खगोलीय विषुववृत्तापासून उत्तरेस किंवा दक्षिणेस हव्या असलेल्या बिंदूपर्यंतचा त्याच्या होरावृत्तावरील कोन म्हणजे डेक्लिनेशन किंवा क्रांती (Declination; लघुरूप: Dec; चिन्ह: δ) होय. खगोलशास्त्रामध्ये डेक्लिनेशन हा विषुववृत्तीय निर्देशांक पद्धतीमधील अंतराळातला एक निर्देशांक आहे. विषुवांश व डेक्लिनेशन मिळून खगोलीय निर्देशक पद्धत बनते.

स्पष्टीकरण

डेक्लिनेशन हे पृथ्वीवरील भौगोलिक अक्षांशाशी समतुल्य आहे. खगोलीय विषुववृत्ताच्या उत्तरेकडील बिंदूंचे डेक्लिनेशन धन व दक्षिणेकडील बिंदूंचे ऋण असते. कोन मापनाचे कोणतेही एकक डेक्लिनेशन मोजण्यासाठी वापरले जाऊ शकते. पण खगोलशास्त्रात डेक्लिनेशन मोजण्यासाठी षष्टि-कमान प्रणालीतील डिग्री (°), मिनिट (') आणि सेकंद (") ही एकके वापरली जातात.

  • खगोलीय विषुववृत्ताचे डेक्लिनेशन ०° आहे.
  • उत्तर खगोलीय ध्रुवाचे डेक्लिनेशन +९०° आहे.
  • दक्षिण खगोलीय ध्रुवाचे डेक्लिनेशन -९०° आहे.