डॅलहार्ट (टेक्सास)
डॅलहार्ट हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील डॅलाम काउंटी व हार्टली काउंटीत वसलेले गाव आहे. डॅलाम काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेले हे गाव इ.स. १९०१मध्ये वसवले गेले. २००० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७,२३७ आहे. हे गाव यु.एस. हायवे ८७, यु.एस. हायवे ३८५ आणि यु.एस. हायवे ५४च्या तिठ्यावर आहे.
रिता ब्लांका लेक राज्योद्यान येथून दोन मैल दक्षिणेस आहे.
अर्थव्यवस्था
येथील अर्थव्यवस्था मुख्यत्वे शेतीप्रधान आणि पशुपालनाधारित आहे. येथे गायी व डुकरांची पैदास होते तसेच चीझ तयार करण्याचा कारखानाही आहे. याशिवाय डॅलहार्टमध्ये तुरुंग आहे.