Jump to content

डॅनियेल डेफो

डॅनियल डेफोचे चित्र

डॅनियेल डेफो (इंग्लिश: Daniel Defoe; अंदाजे १६५९-१६६१ - २४ एप्रिल, इ.स. १७३१) हा एक इंग्लिश लेखक होता. त्याने लिहिलेले रॉबिन्सन क्रुसो हे पुस्तक प्रचंड गाजले व आजही साहित्याचा एक अप्रतिम नमुना मानले जाते. इंग्लंडमध्ये ग्रंथ स्वरूपाचे लिखाण लोकप्रिय बनवण्यामागे डेफोचा मोठा हातभार होता. डेफोने प्रचंड प्रमाणात लिखाण केले. त्याने राजकारण, गुन्हेगारी, धर्म, लग्न आणि इतर अनेक विषयांवर ५००पेक्षा जास्त पुस्तके, लेख आणि पत्रके लिहिली.