Jump to content

डूलिटल झडप

डूलिटल झडप (इंग्लिश:Doolittle Raid) ही दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेने जपानविरुद्ध आखलेली मोहीम होती.

युद्धाच्या ऐनमध्यावर एप्रिल १८, इ.स. १९४२ रोजी अमेरिकेने आपल्या विमानवाहू नौकांवरून विमाने उडवून जपानच्या मुख्य चार बेटांपैकी एक असलेल्या होन्शू बेटावर बॉम्बफेक केली. या अनपेक्षित आणि अघटित अशा हल्ल्याने जपानचे आर्थिक किंवा लश्करी नुकसान झाले नसले तरी अमेरिकेच्या लश्कराचे व जनतेचे मनोधैर्य उंचावले व जपानी जनतेला आपण कायमचे सुरक्षित नसल्याची जाणीव झाली.