Jump to content

डी.बी. चंद्रेगौडा

डी.बी. चंद्रेगौडा (ऑगस्ट २६, इ.स. १९३६-हयात) हे भारतातील राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७१ आणि इ.स. १९७७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कर्नाटक राज्यातील चिकमगळूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा इ.स. १९७७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव झाला होता. त्यांना लोकसभेत पुनःप्रवेश करणे शक्य व्हावे म्हणून डी.बी. चंद्रेगौडांनी आपल्या चिकमागळूरच्या खासदारपदाचा राजीनामा इ.स. १९७७ मध्ये दिला.त्या जागी पुढे पोटनिवडणुक होऊन त्यात इंदिरा गांधींनी विजय मिळवला. नंतरच्या काळात डी.बी. चंद्रेगौडांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि त्या पक्षाचे उमेदवार म्हणून ते इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कर्नाटक राज्यातीलच उत्तर बंगलोर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.