डी.एच.एल. एक्सप्रेस
डी.एच.एल. एक्सप्रेस ही जर्मनीच्या डॉईच पोस्ट ह्या कंपनीची मालवाहू सेवा आहे. १९६९ साली अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को शहरामध्ये स्थापन झालेल्या डी.एच.एल.चे मालकी हक्क डॉईच पोस्टने २००१ साली घेतले. सध्या हवाई व जलमार्गाने मालवाहतूक करणारी डी.एच.एल. एक्सप्रेस ही जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. डी.एच.एल. एक्सप्रेसचे मुख्यालय बॉन ह्या शहरामध्ये आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत