डिसेंबर ३१
डिसेंबर ३१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३६५ वा किंवा लीप वर्षात ३६६ वा दिवस असतो.
हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षाचा अखेरचा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
- १६०० - ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना
- १८०२ - दुसरा बाजीराव याने तैनाती फौजा स्वीकारून वसई येथे तह केला.
जन्म
- १८६९ - हेन्री मॅटिसे चित्रकार.
- १८७१ - गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव, वडोदरा येथील भारतीय आधुनिक व्यायामविद्येचे प्रवर्तक, कन्या आरोग्य मंदिराचे स्थापक.
- १९०७ - हरिवंशराय बच्चन, हिंदी कवी
- १९१० - पं. मल्लिकार्जुन मन्सूर, ग्वाल्हेर घराण्याचे हिंदुस्तानी शास्त्रीय गायक.
- १९४३ - बेन किंग्जली अभिनेता.
मृत्यू
- १९२ - कोमॉडस, रोमन सम्राट.
- ३३५ - संत सिल्व्हेस्टर.
- १६१० - लुडॉल्फ व्हान स्युलेन, जर्मन गणितज्ञ.
- १६५० - दॉर्गोन, चीनी सम्राट.
- १६७९ - जियोव्हानी आल्फोन्सो बोरेली, इटालियन भौतिकशास्त्रज्ञ.
- १७९९ - ज्यॉॅं-फ्रांस्वा मारमोंटेल, फ्रेंच लेखक.
- १८७२ - अलेक्सिस किवी, फिनिश लेखक.
- १८७७ - गुस्ताव कुर्बे, फ्रेंच चित्रकार.
- १८८९ - इयोन क्रेंगा, रोमेनियन लेखक.
- १८९४ - थॉमस जोन्स स्टिल्ट्येस, डच गणितज्ञ.
- १९०५ - अलेक्झांडर पोपोव्ह, रशियन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९२६ - वि.का. राजवाडे इतिहासाचार्य.
- १९३६ - मिगेल दि उनामुनो, स्पॅनिश लेखक.
- १९५२ - हॅंक विल्यम्स, अमेरिकन संगीतकार.
- १९६४ - ओलाफुर थॉर्स, आइसलॅंडचा पंतप्रधान.
- १९७१ - डॉ. विक्रम साराभाई, भारतीय अंतराळ संशोधक.
- १९७७ - सबाह तिसरा अल-सलीम अल-सबाह, कुवैतचा शेख.
- १९८० - मार्शल मॅकलुहान, केनेडियन लेखक.
- १९८६ - राजनारायण, भारताचे केंद्रीय आरोग्य मंत्री.
- १९९३ - झ्वियाद गामसाखुर्दिया, जॉर्जियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
- १९९७ - छोटा गंधर्व स्वरराज.
- २००३ - आर्थर आर. फोन हिप्पेल, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- २००४ - जरार्ड देब्रू, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ.
- २०११ - वंदना विटणकर, मराठी कवयित्री, गीतकार, बालसाहित्यकार.
- २०१६ - बाळासाहेब विखे पाटील, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते.
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर डिसेंबर ३१ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
डिसेंबर २९ - डिसेंबर ३० - डिसेंबर ३१ - जानेवारी १ - जानेवारी २ - डिसेंबर महिना