डिसेंबर ३
डिसेंबर ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३७ वा किंवा लीप वर्षात ३३८ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
एकोणिसावे शतक
विसावे शतक
- १९७१ - पाकिस्तानने भारतावर हल्ला केला.
- १९८४ - भोपाल , येथे मिथिल आयसो सायनेट या वायूची गळती होऊन हजारो लोक मृत्यूमुखी पडले.
एकविसावे शतक
- २००९ - सोमालियाची राजधानी मोगादिशूमधील आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात तीन मंत्र्यांसह २५ ठार.
जन्म
- १३६८ - चार्ल्स सहावा, फ्रांसचा राजा.
- १८५४ - विल्यम मिल्टन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १८८४ - डॉ. राजेंद्र प्रसाद, स्वतंत्र भारताचे प्रथम राष्ट्रपती.
- १८८४ - टिब्बी कॉटर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १८९९ - इकेदा हयातो, जपानी पंतप्रधान.
- १९०५ - लेस एम्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९२३ - ट्रेव्हर बेली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९२५ - केन फन्स्टन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९३७ - बिनोद बिहारी वर्मा, मैथिली लेखक.
- १९५८ - रिचर्ड रीड, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९६३ - ऍशली डिसिल्व्हा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७४ - चार्ल विलोबी, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७६ - मार्क बाउचर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- ११५४ - पोप अनास्तासियस चौथा.
- १७६५ - लॉर्ड जॉन फिलिप सॅकव्हिल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९१२ - प्रुदेन्ते होजे दि मोरे बारोस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
- १९७९ - मेजर ध्यानचंद, भारतीय हॉकी खेळाडू.
- २०११ - देव आनंद, भारतीय चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता.
प्रतिवार्षिक पालन
- वकील दिन - भारत.
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर डिसेंबर ३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
डिसेंबर १ - डिसेंबर २ - डिसेंबर ३ - डिसेंबर ४ - डिसेंबर ५ - (डिसेंबर महिना)