डिसेंबर २५
डिसेंबर २५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५९ वा किंवा लीप वर्षात ३६० वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
- इ.स. १९२७ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे समारंभपूर्वक जाहीरपणे दहन केले.
- १९७६ - आय.एन.एस. विजयदुर्ग ही युद्धनौका भारतीय नौदलात सामील
- १९९० - वर्ल्ड वाइड वेबची (www) पहिली यशस्वी चाचणी
- १९९१ - मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी सोविएत संघराज्याच्या USSR) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. याच्या दुसऱ्याच दिवशी संघराज्याचे विघटन करण्यात आले आणि जनमत चाचपणीच्या आधारे सर्वप्रथम युक्रेन हा देश संघराज्यातुन बाहेर पडला.
एकविसावे शतक
जन्म
- १८६१ - पंडीत मदनमोहन मालवीय भारतीय स्वातंत्र्यसेनानी.बनारस हिन्दू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक
- १८७६ - मुहम्मद अली जीना, पाकिस्तानचे संस्थापक.
- १९१४ - माधव गोविंद काटकर, मराठी कवी.
- १९१४ - डॉ. चिं.श्री. कर्वे, मराठी विज्ञानलेखक.
- १९१९ - नौशाद भारतीय संगीतकार.
- १९२४ - अटलबिहारी वाजपेयी, भारताचे माजी पंतप्रधान.भारतीय जनता पक्षाचे नेते, असामान्य संसदपटू, अलौकिक वक्ते व उत्तुंग प्रतिभेचे ओजस्वी कवी, पद्मविभूषण
- १९२६ - डॉ. धर्मवीर भारती, हिंदी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार व ’धर्मयुग’ साप्ताहिकाचे संपादक.
- १९२६ - चित्त बसू, फॉरवर्ड ब्लॉकचे सरचिटणीस.
- १९२७ - राम नारायण.
- १९३२ - प्रभाकर जोग, व्हायोलिनवादक, संगीत संयोजक व संगीतकार.
- १९४० - रा.रं. बोराडे, मराठी लेखक.
- १९४९ - मियाँ नवाझ शरीफ, पाकिस्तानचे १२ वे पंतप्रधान.
मृत्यू
- ७९५ - पोप एड्रियान पहिला.
- १९५७ - श्री.म. माटे, मराठी साहित्यिक.
- १९७२ - चक्रवर्ती राजगोपालाचारी, भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल, मद्रास इलाख्याचे मुख्यमंत्री, स्वातंत्र्यसैनिक, लेखक.
- १९७७ - चार्ली चॅप्लीन विनोदी नट.अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार.
- १९९४ - ग्यानी झैलसिंग भारताचे माजी राष्ट्रपती.भारताचे ७ वे राष्ट्रपती, पंजाबचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री
- १९९८ - दत्तात्रय गोविंद तथा दत्ता खेबुडकर, मराठी नाटककार व दिग्दर्शक.
- २००५ - म.म. देशपांडे, मराठी कवी.
- २०११ - सत्यदेव दुबे, भारतीय हिंदी भाषक नाट्य-अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते.
- २०१५ - साधना, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
- २०२१ - बिशप डेसमंड टुटु, दक्षिण आफ्रिकेचा बिशप.
प्रतिवार्षिक पालन
- नाताळ – येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस
- मनुस्मृती दहन दिन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर डिसेंबर २५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
डिसेंबर २३ - डिसेंबर २४ - डिसेंबर २५ - डिसेंबर २६ - डिसेंबर २७ - (डिसेंबर महिना)