Jump to content

डिसेंबर २२


डिसेंबर २२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५६ वा किंवा लीप वर्षात ३५७ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

सतरावे शतक

एकोणिसावे शतक

  • १८०७ - अमेरिकन काँग्रेसने एम्बार्गो ऍक्ट केला. अमेरिकेचे बाहेरच्या जगाशी व्यापारी संबंध संपुष्टात.
  • १८०९ - अमेरिकन काँग्रेसने नॉन इंटरकोर्स ऍक्ट केला. एम्बार्गो ऍक्ट रद्द. युनायटेड किंग्डमफ्रांस शिवाय अमेरिकेचे बाहेरच्या जगाशी व्यापारी संबंध परत सुरू.
  • १८५१ - जगातील पहिली मालगाडी भारतात रूडकी येथे चालविली गेली.
  • १८६४ - विल्यम टेकुमेश शेर्मनची समुद्रास कूच समाप्त. सवाना, जॉर्जिया युनियन सैन्याने काबीज केले.
  • १८८५ - इटो हिरोबुमी जपानचा पहिला सामुराई पंतप्रधान झाला.

विसावे शतक

  • १९०९ - भारतीय क्रांतिकारी अनंत कान्हेरेनी नासिकचा जिल्हाधिकारी जॅक्सनची गोळ्या घालून हत्या केली.
  • १९३७ - न्यू यॉर्कमध्ये लिंकन टनेल वाहतुकीसाठी खुली.
  • १९६३ - क्रुझ शिप लाकोनिया मडेरापासून २९० कि.मी. उत्तरेस जळाली. १२८ ठार.
  • १९५३ ‌- राज्य पुनर्रचनेसाठी भारतात उच्चाधिकार समिती स्थापन. यातून पुढे भाषावार प्रांतरचना झाली.
  • १९७२ - अँडीज पर्वतराजीत विमान कोसळल्यानंतर दहा आठवड्यांनी १४ प्रवासी जिवंत सापडले. त्यांनी काही काळ मानवी मांसावर गुजराण केली होती.
  • १९८९ - आठवडाभर चाललेल्या दंगल व जाळपोळीनंतर हुकूमशहा निकोलाइ चाउसेस्क्युने रोमेनियाचे राष्ट्राध्यक्षपद सोडले. शीतयुद्धाच्या अखेरीला कम्युनिस्ट राष्ट्रे कोसळण्यामध्ये एक महत्त्वाचा टप्पा.
  • १९८९ - बर्लिनचे ब्रॅन्डेनबर्ग गेट ३० वर्षांनी खुले. पूर्व आणि पश्चिम जर्मनीची फाळणी संपुष्टात.
  • १९९५ - प्रसिद्ध रंगकर्मी के. एन. पणीक्‍कर यांना मध्य प्रदेश सरकारचा ’कालिदास सन्मान’ जाहीर
  • १९८४ - न्यू यॉर्कच्या भुयारी रेल्वेत बर्नार्ड ह्युगो गोत्झने चार गुंडांना गोळ्या घातल्या.
  • १९८९ - आठवडाभर चाललेल्या दंगल व जाळपोळीनंतर निकोलाइ चाउसेस्क्युने रोमेनियाचे अध्यक्षपद सोडले. इयोन इलेस्क्यु अध्यक्षपदी.
  • १९८९ - बर्लिनचे ब्रांडेनबर्ग गेट ३० वर्षांनी खुले. पूर्व आणि पश्चिम जर्मनीची फाळणी संपुष्टात.
  • १९९० - लेक वालेंसा पोलंडच्या अध्यक्षपदी.
  • १९९९ - स्पेनच्या नागरी रक्षकांनी ७५० कि.ग्रॅ. वजनाची विस्फोटके असलेली अजुन एक गाडी पकडली. (पहा डिसेंबर २१)
  • १९९९ - तांद्जा ममदु नायजरच्या राष्ट्राध्यक्षपदी.

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे




डिसेंबर २० - डिसेंबर २१ - डिसेंबर २२ - डिसेंबर २३ - डिसेंबर २४ - (डिसेंबर महिना)