Jump to content

डिसेंबर २१

ह्या दिवशी सूर्य दक्षिण गोलार्धातील अंतिम टोक गाठत असल्याने भारतीय सौर कॅलेंडरच्या ९ वा महिना अग्रहायण मधील हा अंतिम दिवस असून भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरमध्ये ह्या दिवशी ३० अग्रहायण ही तारीख असते. भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरप्रमाणेच ग्रेगोरीयन कॅलेंडरही सौर कॅलेंडर आहे.


मात्र ग्रेगोरीयन कॅलेंडरमध्ये खगोलशास्त्राला महत्त्व न देता ख्रिस्ती धर्माला महत्त्व दिल्याने सूर्याशी संबंधित महत्त्वाच्या ४ दिवसांपैकी एक दिवस असूनही ख्रिस्ती कॅलेंडरचाना कोणता महिना या दिवशी सुरू होतोना संपतो.

डिसेंबर २१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५५ वा किंवा लीप वर्षात ३५६ वा दिवस असतो.


हा उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस असून रात्र सर्वात मोठी असते.

ठळक घटना आणि घडामोडी

सतरावे शतक

  • १६२० - विल्यम ब्रॅडफोर्ड आणि मेफ्लॉवर पिल्ग्रिम्स प्लिमथ, मॅसेच्युसेट्स मध्ये प्लिमथ रॉक या ठिकाणी उतरले. यांची वसाहत म्हणजे अमेरिकेतील ब्रिटिश वसाहतींची मुहूर्तमेढ होय.

एकोणिसावे शतक

विसावे शतक

  • १९०९ - अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा खून केला.
  • १९१३ - आर्थर विनचे वर्ड क्रॉस, हे पहिले शब्दकोडे न्यू यॉर्क वर्ल्डमध्ये प्रकाशित.
  • १९५८ - चार्ल्स दी गॉल फ्रांसच्या अध्यक्षपदी. युनियन देस् देमोक्रातेस् पुरला रिपब्लिक पक्षाला ७८.५%चे बहुमत.
  • १९६८ - अपोलो ८चे केनेडी स्पेस सेंटरहून उड्डाण. फ्रॅंक बॉर्मन, जेम्स लोव्हेल आणि विल्यम ऍंडर्स अंतराळात.
  • १९७९ - लंडन मध्ये ऱहोडेशियाच्या स्वातंत्र्यासाठीच्या ठरावाचा मसुदा ठरला.
  • १९८६ - रघुनंदन स्वरूप पाठक यांनी भारताचे १८वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • १९८७ - फिलिपाईन्सच्या तब्लास सामुद्रधुनीत प्रवासी फेरी दोन्या पाझ आणि तेलवाहू जहाज व्हेक्टर १ मध्ये टक्कर. १,०००हून अधिक ठार.
  • १९८८ - लिब्यातील अतिरेक्यांनी पॅन ऍम फ्लाइट १०३ या बोईंग ७४७ जातीच्या विमानात लॉकरबी, स्कॉटलंड वर बॉम्बस्फोट घडविला. जमिनीवरील ११ सह २७० ठार.
  • १९९९ - स्पेनच्या नागरी रक्षकांनी ९५० कि.ग्रॅ. वजनाची विस्फोटके असलेली गाडी पकडली. तोरे पिकासो वरील हल्ला टळला.

एकविसावे शतक

  • २००१ - देशावरील आर्थिक संकट आणि शहरांमधील दंगलींना जबाबदार ठरवून आर्जेन्टिनाच्या राष्ट्राध्यक्ष फर्नान्डो देला रुआची हकालपट्टी.

जन्म

मृत्यू

  • १२९५ - प्रोव्हान्सची मार्गेरित बेरेन्जर, फ्रांसचा राजा लुई नववा याची राणी.
  • १३०८ - हेसीचा हेन्री पहिला.
  • १८२४ - जेम्स पार्किन्सन, कंपवाता आणि मानवी मेंदू संशोधक.
  • १९४५ - जनरल जॉर्ज पॅटन दुसऱया महायुद्धातील यूरोपमधील अमेरिकन सेनापती.
  • १९७९ - नरहर रघुनाथ तथा न.र. फाटक, मराठी चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक.
  • १९९३ - मल्हार रंगनाथ तथा राजाभाऊ कुलकर्णी, भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार.
  • १९९७ - पं. प्रभाशंकर गायकवाड, भारतीय सनईवादक.
  • १९९७ - निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ पी. सावळाराम, मराठी भावगीतलेखक.
  • २००४ - औतारसिंग पेंटल भारतीय वैद्यकीय शास्त्रज्ञ.
  • १९१३ - आर्थर विन

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे



डिसेंबर १९ - डिसेंबर २० - डिसेंबर २१ - डिसेंबर २२ - डिसेंबर २३ - (डिसेंबर महिना)