डिसेंबर १५
डिसेंबर १५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३४९ वा किंवा लीप वर्षात ३५० वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
सहावे शतक
- ५३३ - टिकामेरोनची लढाई - व्हॅन्डाल राजा जेलिमर आणि रोमन सेनापति बेलिसारियस यांच्या सैन्यात.
सातवे शतक
- ६८७ - संत सर्जियस पहिला पोपपदी.
तेरावे शतक
- १२५६ - मोंगोल सेनानी हुलागु खानने ईराणमधील अलामतचा बालेकिल्ला हश्शाशिन काबीज करून ऊध्वस्त केले. मोंगोलांची ईशान्य आशियातील आगेकूच सुरू.
अठरावे शतक
- १७९१ - व्हर्जिनीयाच्या विधानसभेने मान्य केल्यावर अमेरिकन नागरिकांचा हक्कनामा कायदा म्हणून अस्तित्वात आला.
विसावे शतक
- १९११ - नवी दिल्लीचा पायाभरणी समारंभ सम्राट पंचम जॉर्जच्या हस्ते झाला.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - जनरल डग्लस मॅकआर्थरने हुकुमनाम्याद्वारे जपानमधील शिंटो धर्माची राज्यधर्म म्हणूनची मान्यता काढूल घेतली.
- १९६१ - ऍडोल्फ ऐकमनला पंधरा आरोपांखाली मृत्यूदंड. आरोपांमध्ये ज्यूंचे शिरकाण, मानवतेविरूद्ध गुन्हे आणि बेकायदा संस्थाचे सदस्यत्व, वगैरेची गणना.
- १९७० - व्हेनेरा - ७ हे सोवियेत संघाचे अंतराळयान यशस्वीपणे शुक्र ग्रहावर उतरले. पृथ्वी सोडुन इतर कुठल्याही ग्रहावर उतरणारे हे पहिलेच यान होते.
- १९७६ - सामोआला संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्यत्व.
- १९९१ - चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांना ऑस्कर पारितोषिक जाहीर
- १९९४ - नेटस्केप नॅव्हिगेटर या आंतरजाल न्याहाळकाची पहिली आवृत्ती प्रकाशित.
- १९९४ - पलाउला संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्यत्व.
- १९९७ - शारजाजवळील वाळवंटात ताजिकीस्तानचे टी.यु.१५४ जातीचे विमान कोसळले. ८५ ठार.
- १९९८ - बँकॉक येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कबड्डीमधे सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक
- २००० - चेर्नोबिलची अणुभट्टी अखेर कायमस्वरूपी बंद.
जन्म
- ३७ - नीरो, रोमन सम्राट.
- १३० - लुसियस व्हेरस, रोमन सम्राट.
- १२४२ - राजकुमार मुनेताका, जपानी शोगन.
- १९०३ - स्वामी स्वरूपानंद, रत्नागिरीजवळच्या पावस गावातील गुरू.
- १९०५ - इरावती कर्वे, साहित्य अकादमी व महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ .
- १९३२ - टी.एन. शेषन, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त.
- १९३५ - उषा मंगेशकर, भारतीय पार्श्वगायिका व संगीतकार.
- १९७६ - बैचुंग भुतिया, भारतीय फुटबॉल खेळाडू.
मृत्यू
- १०२५ - बेसिल दुसरा, बायझेन्टाईन सम्राट.
- १०७२ - आल्प अर्स्लान, तुर्कीचा राजा, पर्शिया (ईराण) मध्ये.
- १२६३ - हाकोन चौथा, नॉर्वेचा राजा.
- १७४९ : छत्रपती शाहू महाराज
- १९५० : सरदार वल्लभभाई पटेल – स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री, भारताचे लोहपुरुष, भारतरत्न (मरणोत्तर - १९९१)
प्रतिवार्षिक पालन
- जागतिक चहा दिन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर डिसेंबर १५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
डिसेंबर १३ - डिसेंबर १४ - डिसेंबर १५ - डिसेंबर १६ - डिसेंबर १७ - (डिसेंबर महिना)