डिझायर नेम्ड डेव्हलपमेंट
डिझायर नेम्ड डेव्हलपमेंट
सदरील पुस्तक, भारतीय लेखक आदित्य निगम यांनी लिहिली आहे. या पुस्तकाचे प्रकाशन पेंग्विन बुक्स इंडिया यांनी २०११ साली मध्ये केले.[१] मूलतः हे पुस्तक ग्राहकहितामुळे भारतातल्या आर्थिक व्यवस्थेवर काय परिणाम झाले आहेत याची मांडणी करते. शेतकरी वर्गाची उद्योगीकरणासंबंधी प्रतिक्रिया, खाजगी उद्योजकांमुळे होणारा नेसर्गिक साधन संपतीचा विनाश आणि याचबरोबर आधुनिक अर्थशास्त्राची व्याख्या काय आहे, हेही या पुस्तकात सांगितले आहे.
सदरील पुस्तक खालील विषयांवर चर्चा साधत आहे.
ग्राहक बनवणे
अन्न आणि वस्त्र या दोन गरजाही भागवू न शकणाऱ्या भारतासारख्या विशाल देशात लोकांना विदेशांतील लोक असे उच्च जीवनमान जगतात असा भास निर्माण करून तुम्ही त्यांच्याप्रमाणे जगा, आम्ही तुम्हाला हव्या त्या वस्तू पुरवू असे म्हणून येथील उद्योगिकीकरणवाल्यांनी भारतीय लोकांना ग्राहक बनवले आहे.
स्वतःमध्ये नको त्या इच्छा निर्माण करणे
मागील दोन दशकात भारतीय लोकांनी पाश्चिमात्यांचे अंधानुकरण केल्यामुळे येथील लोकांच्या इच्छा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. भारतातील लोकांना त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ज्या सोयींची येथे गरजही नाही अशा सोयी नवीन उद्योगिकीकरणाने उपलब्ध केल्या आहेत. उलट त्यामुळे येथील पर्यावरणाचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
स्वयंचलित इंधने आणि ऊर्जेचे संकट
ज्यांच्याकडे सुखउपभोग्य वस्तू जास्त ते श्रीमंत ही कल्पना जपण्यासाठी अमेरिकेसारख्या देशात वाहन निर्मितीसारखे मोठे मोठे कारखाने उभे राहिले. पण हे उद्योग चालवताना त्यातूनच इंधन व उर्जा यांचे संकट उभे राहिले. मग जास्तीत जास्त इंधन निर्मितीसाठी त्यांनी पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी करून जैविक इंधने शोधली.
नॅनोचा प्रवेश
स्वतःचा फायदा पाहणारे उद्योजक एखाद्या उद्योग उभारताना लोकांसाठी उद्योग कसा फायद्याचा आहे असा भास निर्माण करतात उदाहरणार्थ भारतातील नॅनो कार उद्योग.(?? नॅनोमुळे जनतेचा अमूल्य फायदा झाला आहे. इतका की तो पाश्चिमात्यांच्या डोळ्यावर आला.)
उद्योगीकरणाला विरोध होऊ नये यासाठी लोकांना दैववादी बनून फसवणे
लोकांचा उद्योगीकरणाला विरोध होऊ नये यासाठी त्यांना ते उद्योग आपल्या देशासाठी आणि जनतेसाठी कसे फायदेशीर आहेत असे सांगून दिशाभूल केली जाते.
उद्योगीकरणाच्या फायद्यासाठी जमिनीचे अधिग्रहण
लोकांना उद्योगीकरणाचे फक्त फायदे सांगून त्यांना देशाभिमानासारख्या अस्मितेशी जोडल्यामुळे भारतात एक दोन घटना सोडल्या तर उद्योगीकरणाला फार विरोध झाला नाही.
दुसरीकडील उद्योगीकरण
एखाद्या देशात उद्योग उभारले म्हणजे औद्योगिक क्रांती घडून आली नाही, तर सर्व देशांत उद्योग उभे राहत आहेत म्हणून औद्योगिक क्रांती घडत आहे..
आधुनिक कालिदास (?)
सध्याचे उद्योगीकरणवाले आधुनिक कालिदासाप्रमाणे वागत आहेत. ज्या देशांचा वापर करून ते मोठे झाले आहेत त्यांचेच ते नुकसान करत आहेत. उदाहरणार्थ अमेरिका ज्या आखाती देशातील खनिज उद्योगातून मोठी झाली त्यांच्याबरोबरच युद्ध करत आहे.
दुसरे जग शक्य आहे
माणसांच्या अनियंत्रित गरजांयातून नैसर्गिक साधनसंपत्तीची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे, यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. पण आपण जर आपल्या इच्छा कमी केल्या आणि गरजा आटोक्यात आल्या तर येथील समस्याही कमी होतील आणि एका चांगल्या जगाची निर्मिती होईल
फेमिनिस्ट कन्सेप्ट पेट्रिआर्की स्त्री अभ्यास (बायकी कल्पना)
संदर्भ सूची
- ^ Nigam, Aditya (2011). Desire Named Development (इंग्रजी भाषेत). Penguin Books India. ISBN 9780143067139.