डाय हार्ड (चित्रपट)
डाय हार्ड | |
---|---|
दिग्दर्शन | जॉन मॅकटियर्न |
कथा | कादंबरी: रॉडरिक थोर्प |
पटकथा | जेब स्टुअर्ट स्टीवन ई. डिसूझा |
प्रमुख कलाकार |
|
संकलन | जॉन एफ. लिंक फ्रॅंक जे. युरिओस्ट् |
संगीत | मायकल कामेन क्रिस बोर्डमॅन |
भाषा | इंग्लिश |
प्रदर्शित | {{{प्रदर्शन तारीख}}} |
डाय हार्ड हा अमेरीकन ऍक्शनपट असून १९८८ मध्ये प्रदर्शित झाला होता. याचे मुख्य भूमिका ब्रुस विलिस व ऍलन रिकमन यांची आहे. हा चित्रपट रॉडरिक थोर्प यांच्या नथिंग लास्ट फोरएव्हर या कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपट ऍक्शन चित्रपटांसाठी एक मैलाचा दगड असल्याचे मानले जाते. या चित्रपटातची शैली म्हणजे घडणाऱ्या घटनांचा संदर्भ देणारे दुवे सातत्याने आगोदरील घटनांमध्ये दाखवणे ही शैली पुढिल अनेक सुपरहिट ऍक्शन चित्रपटात वापरली गेली. हिंदी मध्ये बाझी चित्रपटाचा काही भाग या चित्रपटावरून कॉपी केला आहे.
कथानक
चित्रपट सुरू होतो ते विमान लॉस एंजेलिसच्या धावपट्टिवर उतरत असते. त्यात न्यू यॉर्क पोलीस खात्यातिल अधिकारी जॉन मक्लेनला (ब्रुस विलिस) विमान उतरताना त्रास होतो असतो. जॉन आपली पत्नी व मुलांना भेटायला नाताळाच्या सुट्टिसाठी लॉस एंजेल्सला चाललेला असतो. विमानात जॉनला त्याच्या शेजाऱ्या कडून घरी गेल्यावर अनवाणी चालयचा सल्ला देतो जेणेकरून त्याचा हा विमान उतरताना होणारा त्रास कमी होइल. विमानतळावर जॉनला त्याची पत्नी भेटायला येत नाही व त्याऍवजी तिच्या कंपनीने पाठवलेला ड्रायव्हर येतो. ड्रायव्हर हा नुकताच परवाना (लायसंस) मिळवलेला पोरगा असतो व जॉन हा त्याच्या ड्रायव्हिंग कारकिर्दीतील पहिला ग्राहक असतो. जॉनची पत्नी हॉली जेनेरो देखील जॉनची वाट पाहात असते व गेल्या काही महिन्यातिल घडामोडिंमुळे व्यथित असते. ती लॉस एंजेल्समधिल एका नाकाटोमी कॉरपोरेशन या जापानी कंपनीत वरच्या हुद्यावर काम करत असते. हॉलिने कंपनी मध्ये बढति मिळवण्यासाठी आपल्या लग्नाआधिच्या नावाचा वापर केलेला असतो. जेणेकरून तिला बढती मिळणे सोपे असते. तसेच नोकरीसाठी तिने जॉनचे न्युयोर्क मधील घर सोडुन लॉस एंजेल्स मध्ये आलेली असते. या गोष्टी जॉनला खटकत असतात व तिला जाब विचारण्यासाठि तिला भेटायला म्हणून घराच्या ऍवजी तिच्या ऑफिस मध्ये भेटणे पसंत करतो. हॉलिचे ऑफिस हे नाकाटोमी कॉर्पोरेशनच्या ४० मजली इमारतीत असते. जेव्हा जॉन तिच्या ऑफिस मध्ये पोहोचतो तेव्हा तिथे कंपनीची नाताळाची पार्टी ३० व्या मजल्यावर चालू असते. जॉनचे माफक स्वागत होते व तो हॉलिला भेटतो.
याच दरम्यान इमारतीच्या तळमजल्या मध्ये काही लोक सामान पोस्त करणाऱ्या गाडितुन आत घुसतात व त्याच वेळेस दोन जण पहिल्या मजल्यवरील रिसेप्शन मध्ये पोहोचतात. पोहोचताच तेथिल रिसेप्शनिस्टला गोळी घालुन ठार करतात व रिसेप्शनचा ताबा घेतात. लगेचच पहिल्या मजल्यावरील सुरक्षारक्षकाला ठार करतात. सर्व ठीक असे पाहून ते डिलिव्हरी वॅन मधील लोकांना वर जाण्याचा इशारा करतात व लगेचच इमारतीचे सर्व दरवाजे बंद करून टाकतात. या लोकांचा सुत्रधार असतो हान्स ग्रुबर (ऍलन रिकमन) हा जर्मन रॅडिकल ग्रुपचा सदस्य असतो व आपले काही जर्मन साथिदारांना घेउन ही इमारत व नाकाटोमीचे कर्मचारी यांचे अपहरण करण्याचा त्याचा डाव असतो. हान्स व त्याचे साथिदार पार्टी चालु असते त्याठिकाणी पोहोचतात व त्याच वेळेस इतर साथिदार इमारतीची संपर्क व्यवस्था बंद पाडणे, बंदुका व क्षेपणास्त्रे यांची रवानगी व इमारतीमध्ये ठिकठिकाणी बॉम्ब पेरणे इत्यादी कामे करत असतात. हॅन्स व त्याचे साथिदार पार्टीमध्ये घुसण्या आगोदर जॉन व हॉली मध्ये छोटेसे भांडण होते. हॉलिला पार्टिमध्ये बोलवणे आल्यामुळे ती जॉनला विश्रामकक्षामध्ये सोडुन पार्टिमध्येजाते. जॉन विश्रामकक्षामध्ये अनवाणी चालण्याचा सराव करतो व आपल्या ड्रायव्हरशी फोन वर बोलतो. त्याचे बोलण्या मध्येच फोन बंद पडतो. हॅन्स व त्याचे साथिदार अचानक पार्टीमध्ये घुसतात व गोळीबार करून सर्वामध्ये दहशत निर्माण करतात. गोळीबारामुळे जॉन सावध होतो व त्याच्या कक्षा पर्यंत हान्सचे साथिदार येइ पर्यंत पळुन जातो. हान्स सर्व जण जमल्याची खात्री झाल्यावर कंपनीचे डायरेक्टर मि टकागी कुठे आहेत असा प्रश्न विचारतो. टकागीचे त्याला माहिती असलेले वर्णन सांगयाला सुरुवात करतो त्यामुळे टकागींना लपुन राहाण्यात काही अर्थ वाटत नाही. व हान्सला काय काम आहे असे विचारतात. हान्स टकागींना दुसऱ्या मजल्यावर घेउन जातो.
दुसऱ्या मजल्यावर टकागींना हान्स त्यांच्या कंपनीच्या तिजोरीचा पासवर्ड विचारतो. व हान्स हा चोरी करायच्या उद्देशाने आला आहे असे समजते. टकागी पासवर्ड देत नाहित व हान्सला सांगतात कीया परिस्थितित तुम्हाला मला मारावेच लागेल. टकागीला मारताना जॉन पाहातो व हान्सला शंका येते की कोणीतरी पकडायचे राहिले आहे. तो आपल्या साथिदारांना जॉनला शोधायचे आदेश देतो. हान्स ने बरोबर पासवर्ड शोधुन काढणार हॅकर बरोबर आणलेला असतो व त्याला तो पासवर्ड शोधायच्या कामावर लावतो.
जॉनला या परिस्थितीत पोलिसांना खबर कशी पोहोचेल याचा विचार करत असतो तो बिल्डिंगचा अग्नीशमन अलार्म वाजवतो पण तो प्रयत्न हान्स उधळुन लावतो. जॉन कुठे आहे त्याचा पत्ता लागल्याने एक जण त्याला शोधत शोधत ३४ व्या मजल्यावर पोहोचतो. जॉन व त्याची हातापाई होते व त्यात जॉन त्याला जिन्यामध्ये पाडुन ठार करतो. या साथिदाराकडिल बॅगेत जॉनला मशीन गन व वॉकिटॉकिचा संच मिळतो. जॉन त्याचा मृतदेह लिफ्ट मधुन ३०व्या मजल्यावर पाठवुन देतो व हान्सला त्याच्या विरुद्ध रणशिंग पुकारल्याची सुचना देतो.
जॉन वॉकिटॉकि घेउन इमारतीच्या गच्ची वर जातो व पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो व परिस्थिति सांगतो. त्याची मागणी पोलीस कक्षामध्ये कोणीतरी जोक करत आहे असे समजतात या दर्म्यान जॉन इमारतीच्या गच्चीवर आहे असे हान्सला कळते तो त्याचा भरवशाचा साथिदार कार्लला जॉनचा वध करयाला पाठवतो. पोलीस नियंत्रण कक्षेमध्ये बोलत असतानाच कार्ल त्याच्यावर गोळिबार सुरू करतो. गोळिबाराचा आवाज आल्यामुळे पोलीस नियंत्रण कक्षेमधुन चौकशी करण्यासाठी त्या भागातिल गस्ति वर असलेला पोलीस पॉलला पाठवण्यात येते. इकडे जॉन व कार्ल मध्ये जोरदार घुमश्च्क्री होते. इमारती मध्ये पोलीस आल्यामुळे कार्लला तात्पुरती माघार घ्यावी लागते.
पोलिस अधिकारी पॉल इमारतीमध्ये आल्यावर हान्सचे रिसेप्शन मधील साथिदार सर्व काही ठीक आहे असे भासवतात. जॉन पॉलशी खिडकीतुन ओरडुन सांगण्याचा प्रयत्न करतो व परत एकदा हान्सचे साथिदार त्याच्या वर तुटुन पडतात. जॉन हान्सचे दोन साथिदारांना यमसदनी धाडतो. त्यापैकी एकाचा मृतदेह घेउन तो सरळ खाली उभ्या असलेल्या पॉलच्या गाडिवर टाकून देतो व गोळिबार करतो. या प्रकाराने पॉल एकदम गडबडुन जातो व इथे खूप अतिरेकि असून मला जादाची कुमक पाहिजे अशी मागणी करतो. यानंतर इमारतीला पोलिसांचा वेढा पडतो. पण याचा परिणाम म्हणून हान्सची पुढची कामे अजुन पटापट होतात. दरम्यान पोलीस इमारतीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात. हान्स पोलिसांविरुद्ध आक्रमण करतो, पोलिसांचे जीव जाताना पाहून जॉन त्याला सापडलेल्या डिटोनेटर्सचा स्फोट घडवुन आणतो. यामुळे बिल्डिंगचे मोठे नुकसान होते तो पोलिसांची सहानुभूती गमावून बसतो. दरम्यान हॉलिचा सहकारी शहाणपणा दाखवायला जाउन जॉन कोण आहे हे हान्सला सांगतो, पण जॉन तो आपला मित्र नसल्याचे हान्सला वॉकिटॉकि वर सांगतो. हान्स हॉलिच्या सहकाऱ्याला मारून टाकतो.
बाहेर एफ्.बी.आय. परिस्थिती ताब्यात घेते हान्स आपली मागणी त्यांच्यापुढे सादर करतो. त्यामध्यत प्रामुख्याने काही दहशतवादी संघटनेच्या लोकांची सुटकेची व इमारतीपासून विमानतळापर्यंत जाण्यासाठी हेलिकॉप्टरची मागणी असते. एफ्.बी.आय त्याची मागणी मान्य झाल्याचे नाटक करते. हान्स व कार्लची पुन्हा एकदा जॉनशी जोरदार धुमश्चक्री होते यात हान्सचे अजुन काही साथिदार मारले जातात व जॉन अनवाणी असल्याने खूप जखमी होतो व बचावुन निघतो. एफ.बी.आय संपूर्ण इमारतीची वीज तोडुन टाकते त्यामुळे हान्सच्या हॅकरला जी तिजोरी तोडणे शक्य होत नाही ती आरामात उघडली जाते. हान्स व त्याचे उरलेले साथिदार इमारतीचा वरचा भाग बॉम्बने उडवून पैसे घेउन पोबारा करण्याचा प्रयत्नात असतात पण पुन्हा जॉन त्यांचे प्रयत्न उधळुन लावतो व एक एक करून सर्व साथीदार संपवतो. हान्सला हॉलि जॉनची पत्नी आहे असे कळते व तिला बंधक बनवुन शेवटचा पळुन जायचा प्रयत्न करतो. जॉन हान्सला शेवटी गोळी घालतो व हॉलिला त्याच्या ताब्यातुन सोडवतो. हान्सचा इमारतीवरून खाली पडुन म्रुत्यू होतो. शेवटि जॉन आपल्या पत्नीची ओळख पॉलला हॉलि जेनेरो अशी करून देत असतान हॉलि मध्येच त्याला तोडुन मी हॉलि मक्लेन आ हे अभिमानाने सांगते व जॉन व हॉलिमधिल तणाव पुन्हा एकदा सुरळित होतो.
भूमिका
कलाकार | भूमिका |
---|---|
ब्रुस विलिस | जॉन मक्लेन |
ॲलन रिकमन | हान्स ग्रुबर |
बोनी बेडेलिया | होलि जेनेरो-मक्लेन |
रेजिनाल्ड वेलजॉन्सन | पोलीस अधिकारी पॉल |
आलेक्सझांडर गोड्युनोव्ह | कार्ल |