Jump to content

डाबर

डाबर इंडिया लिमिटेड
प्रकार सार्वजनिक
शेअर बाजारातील नावबी.एस.ई.500096
एन.एस.ई.DABUR
उद्योग क्षेत्र ग्राहकोपयोगी वस्तू
स्थापना १८८४
मुख्यालयडाबर कॉर्पोरेट ऑफिस, कौशांबी, साहिबाब, गाझियाबाद, उत्तर प्रदेश, भारत
सेवांतर्गत प्रदेश जगभर
महत्त्वाच्या व्यक्ती
  • अमित बर्मन (अध्यक्ष)
  • मोहित मल्होत्रा ​​(मुख्य कार्यकारी अधिकारी)
उत्पादने आरोग्यासाठीचे पूरकपदार्थ
ओटीसी आणि आयुर्वेदिक औषधे
वैयक्तिक उत्पादने
महसूली उत्पन्न  ८८.२९ billion (US$१.९६ अब्ज)२०१८ - २०१९19)[]
निव्वळ उत्पन्न14.46 अब्ज (US$३२१.०१ दशलक्ष) (2018-19) []
कर्मचारी ७२४३ (२०१६ - २०१७)[]
पोटकंपनी
  • डाबर इंटरनेशनल लिमिटेड
  • डाबर नेपाळ प्रायव्हेट लिमिटेड
  • डाबर इजिप्त लिमिटेड
  • एशियन कन्झ्युमर केर प्रायव्हेट लिमिटेड
  • एशियन कन्झ्युमर केर पाकिस्तान प्रायव्हेट लिमिटेड
  • आफ्रिकन कंझ्युमर केर लिमिटेड
  • डाबर लंका प्रायव्हेट लिमिटेड
  • नेचरले एलएलसी
  • डेर्मोवाइवा स्कीन एसेन्शियल्स इंक लिमिटेड
टीपा: पोटकंपन्या []

डाबर (दत्तार बर्मन या व्यक्तिनावापासून तयार झालेला शब्द) [][] ही भारतीय ग्राहकोपयोगी वस्तू बनवणारी कंपनी आहे. ही १८८४ मध्ये एस के. बर्मन यांनी स्थापन केली होती. ही कंपनी आयुर्वेदिक औषधे आणि नैसर्गिक ग्राहक उत्पादने तयार करते.[] ही भारतातील सर्वात मोठ्या प्रमाणात ग्राहक वस्तू तयार करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे.

इतिहास

डॉ. एस. के. बर्मन कोलकाता येथे आयुर्वेदाचे अभ्यासक होते. १८८० च्या दशकाच्या मध्यात बर्मन यांनी कॉलरा, बद्धकोष्ठता आणि मलेरिया यासारख्या आजारांसाठी आयुर्वेदिक औषधे तयार केली. १८८४मध्ये त्यांनी आपल्या आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करण्यासाठी डाबर इंडिया लिमिटेड सुरू केली. त्यांचा मुलगा सी.एल. बर्मन यांनी डाबरचे पहिले आर ॲन्ड डी (रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेन्ट) युनिट स्थापन केले. सध्याचे अध्यक्ष डॉ. आनंद बर्मन आणि उपाध्यक्ष अमित बर्मन हे बर्मन कुटुंबातील पाचवी पिढी आहे. १९९८ मध्ये जेव्हा त्यांनी कंपनीचे व्यवस्थापन व्यावसायिकांना दिले, तेव्हा बर्मन हे व्यवस्थापनापासून मालकी हक्क वेगळे करणाऱ्या भारतातील पहिल्या व्यावसायिक कुटुंबांपैकी एक होते.[]

संदर्भ

  1. ^ a b "Dabur Q4 Results". Economic Times. 17 February 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "Dabur North America, Dabur Chyawanprash, Chyawan Granules, Dabur USA". Dabur.com. 2020-09-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 July 2017 रोजी पाहिले.
  3. ^ "Annual Report 2014-15". Dabur.com. 2022-02-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 13 April 2017 रोजी पाहिले.
  4. ^ Our founder Archived 2020-09-22 at the Wayback Machine.. Dabur.com. Retrieved on 23 December 2013.
  5. ^ "India's Most Trusted Brands". 2 May 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  6. ^ "Dabur India History | Dabur India Information - The Economic Times". economictimes.indiatimes.com.
  7. ^ "How Dabur's Burmans Segregated Family and Business | Forbes India". Forbes India (इंग्रजी भाषेत). 27 July 2017 रोजी पाहिले.