Jump to content

डागरी गाय

डागरी गाय हा एक शुद्ध भारतीय गोवंश असून याचे मुख्य स्थान गुजरातमधील गोधरा, पंचमहाल, दाहोद, नर्मदा, छोटाउदेपूर आणि महीसागर जिल्ह्यातील आहे. हा गुजरात मधील पारंपरिक मशागतीचा गोवंश आहे, ज्याला "गुजरात माळवी" असेही म्हणतात. बोली भाषेत डागरी म्हणजे 'देशी' किंवा जुना किंवा मूळ.[][]

या गोवंशाला चाऱ्याची कमी गरज असते. खास पौष्टिक आहार जरी नाही दिला तरी मुख्यतः चरण्यावर टिकून राहते. गुजरात मध्ये या गोवंशाची संख्या अंदाजे २,८०,००० आहे. हा गोवंश ग्रामीण भागात तसेच आदिवासी भागात मुख्यतः घरगुती वापरासाठी सांभाळला जातो.[]

शारीरिक रचना

  • डगरी ही जात प्रामुख्याने पांढऱ्या रंगात तर कधी राखाडी रंगाची असते.
  • या गोवंशाच्या शरीराचा आकार बांधेसूद मध्यम ते लहान असून शरीराची लांबी उंचीपेक्षा जास्त असते.
  • या गोवंशाचे कपाळ सरळ असते. शिंगे लहान, पातळ, वरच्या दिशेने वळलेल्या आकारात किंवा टोकदार टोकासह सरळ असतात.
  • प्राण्यांची देखभाल कळपात, व्यापक व्यवस्थापन प्रणालीमध्ये केली जाते आणि त्यांना दिवसा कुरणात नेले जाते आणि सामान्यतः फक्त चरायला ठेवले जाते.
  • गायी कमी प्रमाणात दूध देतात. दूध उत्पादन १.५ ते ३ किलो/दिवस इतकेच असते. प्रति दुग्धपान सरासरी दुधाचे उत्पादन ३१६ किलो (७५-६५० किलो पर्यंत) असते आणि सरासरी दुधाचे फॅट ४.०८ % (३ ते ५.५ % पर्यंत) असते.[][][]

वैशिष्ट्य

इतर जातींच्या तुलनेत ही गाय खूपच कमी दूध देते. त्याचे दूध उत्पादन प्रति स्तनपान चक्र ३०० ते ४०० किलो पर्यंत असते. परंतु या जातीचे बैल डोंगराळ भागात शेतीसाठी सर्वात योग्य आहेत. तसेच, यांच्या लहान आकारामुळे, यांची खाद्याची आवश्यकता कमी आहे. कमी चाऱ्यात जोपासना करण्यायोग्य असल्याने ज्यांच्याकडे कमी शेती आहे अशा आदिवासींसाठी ते अधिक किफायतशीर बनते.[][]

'राष्ट्रीय डेरी विकास बोर्डाच्या (NDDB)' निकषानुसार हा मशागतीचा गोवंश म्हणून ओळखला जातो.[]

भारतीय गायीच्या इतर जाती

भारतीय गायीच्या इतर विविध जातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ a b "Breeds of cattle & buffalo" (इंग्रजी भाषेत). २९ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ a b c d "Dagri Cattle". nabagr.icar.gov.in (इंग्रजी भाषेत). 2021-12-29 रोजी मूळ पानापासून संग्रहित. २९ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ "Dagri". dairyknowledge.in. 2020-12-04 रोजी मूळ पानापासून संग्रहित. २९ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  4. ^ "Gujarat's 'Dagri cow' will get nationwide recognition as indigenous breed". thegreaterindia.in. २९ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.[permanent dead link]
  5. ^ "Breeds | nddb.coop" (इंग्रजी भाषेत). २७ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.

बाह्य दुवे