डब्ल्यूपीपी (जाहिरात कंपनी)
प्रकार | जाहिरात |
---|---|
शेअर बाजारातील नाव | साचा:LSE एन.वाय.एस.ई.: WPP FTSE 100 Component |
उद्योग क्षेत्र | जाहिरात |
मुख्यालय | लंडन, युनायटेड किंग्डम |
महत्त्वाच्या व्यक्ती | रोबेर्तो क्वार्ता |
संकेतस्थळ | www |
डब्ल्यूपीपी पीएलसी ही एक ब्रिटिश बहुराष्ट्रीय संप्रेषण, जाहिरात, जनसंपर्क, तंत्रज्ञान आणि कॉमर्स होल्डिंग कंपनी आहे ज्याचे मुख्यालय लंडन शहरात आहे. २०२३मध्ये ही जगातील सर्वात मोठी जाहिरात कंपनी होती. [१] डब्ल्यूपीपी कडे अनेक कंपन्यांची मालकी आहे. यांत जाहिरात, जनसंपर्क, मीडिया क्षेत्रातील एकेक्यूए, बीसीडबल्यू, सीएमआय मीडिया ग्रुप, एसेन्स ग्लोबल, माइंडशेर, ओगिल्व्ही VML सारख्या मार्केट रिसर्च नेटवर्कचा समावेश आहे. पब्लिसिस, द इंटरपब्लिक ग्रुप ऑफ कंपनीज, आणि ओम्नीकॉम ग्रुप यांसह ही "बिग फोर" एजन्सी कंपन्यांपैकी एक आहे. [२]
डब्ल्यूपीपीचे समभाग लंडन स्टॉक एक्सचेंजवर घेतले-विकले जातात. ही कंपनी फूट्सी १०० निर्देशांकाचा एक घटक आहे. [३]
संदर्भ
- ^ "The world's biggest ad agency is going all in on AI with Nvidia's help". CNN. 21 March 2024 रोजी पाहिले.
- ^ Elliott, Stuart (31 March 2002). "Advertising's Big Four: It's Their World Now". The New York Times.
- ^ "WPP". London Stock Exchange. 17 September 2019 रोजी पाहिले.