Jump to content

डब्ल्यू आय जी डब्ल्यू


डब्ल्यू आय जी डब्ल्यू (WIGW) हे संक्षिप्त रूप बेल्जियममध्ये वापरले जाते. ते विशेष अधिकार असलेले जनतेमधले चार वर्ग दर्शवते. ह्या वर्गातील प्रजेला काही अटींवर सामाजिक सुरक्षेत सूट मिळते.

  • डब्ल्यू - वेडुवेन - विधवा/ विधुर
  • आय - इनव्हॅलिडेन - अपंग
  • जी - गेपेन्शनीयरडेन - निवृत्त
  • डब्ल्यू - वेझेन - ज्याचे आई-वडील हयात नाहीत असा अनाथ मुलगा, अशी अनाथ मुलगी

वरील वर्गात मोडणाऱ्या लोकांना डब्ल्यू आय जी डब्ल्यू कार्ड दिले जाते. या कार्डधारकांना अनेक सवलती मिळतात. उदा. आरोग्य खर्चाचे जास्तीत जास्त बिल भरले जाते, स्वस्त टेलिफोन कनेक्शन, सामाजिक सुरक्षा, एसएसीबी (?) किंवा डी लिजन(?)मध्ये सूट, वगैरे. ह्या सवलती अन्य लोकांना सहसा मिळत नाहीत.