Jump to content

ठोमसे

  ?ठोमसे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरपाटण
जिल्हासातारा जिल्हा
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषामराठी
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/

ठोमसे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

सातारा- बेंगलोर महामार्गावरील उंब्रज गावापासून सुमारे 8 किमी अंतरावर ठोमसे हे गांव आहे. त्याचा भौगोलिक स्थान 17.37873696661763, 73.97599868515661 हे असून गांव सातारा- चिपळूण राज्य महामार्गा पासून सुमारे ४ किमी अंतरावर आहे.

हवामान

येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते.

प्रेक्षणीय स्थळे

ठोमसे गावात प्रामुख्याने मारुती मंदिर तसेच डोंगरात निसर्गाच्या कुशीत असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर ही धार्मिक ठिकाण आहेत. त्याचप्रमाणे पाटण तालुक्यातील एकमेव असा बौद्ध स्मारक (17.36811000959461, 74.00991523633591) देखील आहेत.

गावात असलेल्या डोंगरवरून पलीकडे चाफाळ ची रामघळ असा एक माध्यम श्रेणीचा ट्रेक देखील करता येतो, ज्यात संपूर्ण डोंगर माथा आणि परिसराचे खूप विलोभनीय दृश्य पहावयास मिळते.

इतिहास

ठोमसे गावात प्रामुख्याने माने घराण्याची विसरलेली मुळे पाहावयास मिळतात. माने यांचे मूळ म्हसवडच लागतंय रहिमतपूर आणि म्हसवड चे माने एकच ...!! म्हसवडचेच सगळीकडे इनामदारी, जहागिरी, देशमुखी मिळाल्यावर विखुरले. बहुतांश माने याच्या देशमुखी या यवन (शिवपूर्व) काळातील आहेत. त्यांना सिद्धनाथ म्हसवड हे कुलदैवत .कोकण. मराठवाडा. कर्नाटक मध्ये ही तसेच तंजावर मध्ये ही तसेच धार मध्यप्रदेश मध्ये ही आहेत ही सगळी माने म्हसवडला कुलदैवत दर्शनाला येतात 30/35हजार कुटुंबे आहेत. परंतु ठोमसे गावातील "माने" यांना कोल्हापुरातील ज्योतिबा हे कुलदैवत आहे. या गावातील माने च्या कुळाची माहिती पुढील प्रमाणे -गौर राजवंश वंशज, कुळ - चंद्रवंशी, देवक- गरुड , गोत्र - गार्ग्या .

ठोमसे गावाप्रमानेच पाटण तालुक्यात आणखी दोन गावात म्हणजे मानेवाडी, आणि मानेगांव या गावात देखील माने आढळतात. बाकीच्या ठिकाण च्या मानें च कुलदैवत जोतिबा आहे. काशीळ, कसबा सांगाव.. भिमबहाद्दर माने सरकार क. सांगाव हे सासनकाठी क्र ६ चे मानकरी आहेत जोतिबाचे व वर्ग १ सरदार करविर दरबारातले. माने नाव अनेक कुळात आहे.

गावात असेलल्या वस्त्यावरुन/ वाडीवरून गावाच्या पुरातन असल्याची कल्पना येते, या गावात असलेल्या ज्योतीबाचा अवतार ज्याला स्थानिक शंभूराज संबोधतात. तिथे अनेक प्राचीन वीरगळी देखील होत्या आणि त्याच ठिकाणी पूर्वी गांवठाण असल्याच ग्रामस्थांकडून सांगण्यात येत. तसेच गावाच्या डोंगरात असलेल्या पुरातन शिव मंदिराच्या परिसरात ही प्राचीन वीरगळी आढळून येतात त्याच प्रमाणे या शिवमंदिराच्या आतल्या गाभाऱ्यात एक सतीशिळा देखील आहे. याच मंदिरा मागे प्रामुख्याने देवस्नानासाठी एक लहानशी बाराव वजा विहीर देखील आढळते.

नागरी सुविधा

१. ग्रामपंचायत इमारत

२. प्राथमिक जिलहापरिषद शाळा

३. छत्रपती संभाजी महाराज व्यायाम शाळा

४. वाचनालय

५. पोस्ट ऑफिस

जवळपासची गावे

ठोमसे गावात प्रामुख्याने गनेवाडी, मोरेवाडी, तांबेवाडी या तीन वाड्यां चा समावेश होतो. त्याच पद्धतीने गावाच्या आजूबाजूला उरूल, चाफाळ, निसरे, मल्हारपेठ ही गांव आहेत.

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate
  9. पेशवा दफ्तर, पुणे पुरालेखागार पुणे,
  10. शाहू आणि पेशवा पत्रव्यवहार,
  11. सातारा गॅझेट इ