Jump to content

ठाणे शहरातील वाहतूक व्यवस्था

ठाणे हे शहर इतर प्रदेशांशी रेल्वे आणि मोटार रस्त्यांनी चांगल्या प्रकारे जोडले गेले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ हा ठाणे शहरामधून जातो.

लोहमार्ग (रेल्वे) वाहतूक

ठाणे हे मुंबईच्या मध्य रेल्वे आणि हार्बर उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे.

ठाणे रेल्वे स्थानक

मध्य रेल्वे उपनगरीय मार्ग

मेन लाइन

हार्बर लाइन

ठाणे हे मध्य रेल्वेचे महत्त्वाचे स्थानक आहे. ठाणे ↔ वाशी ही स्थानिक रेल्वेसेवा डिसेंबर २००६ पासून, तर ठाणे ↔तुर्भे ↔नेरूळ ↔पनवेल ही सेवा १०-१-२००९ पासून सुरू आहे.

बस वाहतूक

ठाणे महापालिका परिवहन (टी.एम.टी-ठाणे म्य़ुनिसिपल ट्रान्सपोर्ट)

टी.एम.टी.ची नवीन बस

ठाणे महानगर पालिकेने ९ फेब्रुवारी १९८९ पासून शहरान्तर्गत वाहतुकीसाठी एक स्वतंत्र बससेवा सुरू केली. ती ठाणे महापालिका परिवहन (टी.एम.टी.-ठाणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट).[] या नावाने ओळखली जाते. टी.एम.टी.ची सर्व आगारे ठाण्यात आहेत. कळवा आगार (डेपो) हे सर्वात मोठे आगार आहे. टी. एम. टी.च्या बसगाड्या मुख्यतः ठाणे शहरात धावतात. त्यांतल्या काही कळव्याला आणि मुंब्र्याला जातात.
तसेच, थोड्या बसगाड्या ठाणे महापालिकेचा हद्दीबाहेर इतर महानगरपालिकांमधील खालील ठिकाणापर्यंत जातात. ती ठिकाणे अशी : मीरा-भायंदर महापालिकेच्या हद्दीतले, मीरा रोड रेल्वे स्थानक (पूर्व); मुंबई शहराच्या हद्दीतले मुलुंड रेल्वे स्थानक व केळकर महाविद्यालय; नव्या मुंबईतले आनंद नगर व गणपतिपाडा.

विषय माहिती
बसगाड्या478
बसमार्ग 112
आगारे 6 आगार
बस स्टॅन्ड 12
बस थांबे ३७४ []
दैनंदिन एकूण प्रवास(किलोमीटर) ६३१३५
बसगाड्यांच्या एकूण दैनंदिन फेऱ्या ७११४
दैनंदिन बस प्रवासी 4८००१७
दैनंदिन उत्पन्न (रुपयांत) १३८८५४७/-
बसगाडीचा सरासरी रोजचा प्रवास (किलोमीटर) २११
कर्मचारी संख्या २५५८ []

बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट)

बेस्ट बस
नवीन सी एन जी इंधनावर चालणारी बेस्टची बस
सी एन जी इंधनावर चालणारी 'किंगलॉंग' ही बेस्टची बस

ठाणे शहरात येणारी बी.ई.एस्‌.टी (बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय ॲन्ड ट्रान्सपोर्ट कंपनी) ही दुसरी मोठी सार्वजनिक बस परिवहन सेवा आहे. ही कंपनी ठाण्यासाठी मर्यादित थांबे असलेली बस सेवा पुरवते. ठाण्यातील तीन-हात नाका, कॅडबरी जंक्शन, बाळकुम, लोधा पॅरॅडाइस, हि्रानंदानी इस्टेट, वृंदावन सोसायटी, ब्रह्मांड आणि ठाणे पूर्व स्थानकापासून बी.ई.एस्‌.टी.च्या बसगाड्या मुंबई शहराकडे जातात.

बस प्रकार बस क्रमांक सुरुवात शेवट (ठाणे) मार्गे
वातानुकूलितए एस १बॅकबे आगार(मुंबई)कॅडबरी जंक्शनपूर्व गतिमार्ग'
वातानुकूलितए एस ३नेहरू तारांगण (वरळी) / वीर कोतवाल उद्यान (दादर-प्लाझा टॉकीज).कॅडबरी जंक्शन []पूर्व गतिमार्ग
वातानुकूलितए एस ५कुर्ला टेलिफोन स्टोर्स कॅडबरी जंक्शनवान्द्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स मार्गे
वातानुकूलित जलद ए १३ जलदबॅकबे आगारहिरानंदानी इस्टेट पूर्व गतिमार्ग उड्डाण्पूल, घोडबंदर रोड
वातानुकूलित जलद ए १३ जलद-इ.एक्ष.टी बॅकबे आगारलोधा पॅराडाइसपूर्व गतिमार्ग उड्डाणपूल, घोडबंदर रोड
जलद सी - ४२ जलदराणी लक्ष्मीबाई चौक (सायन सर्कल)दादलानी पार्क (बाळकुम)पूर्व गतिमार्ग उड्डाणपूल '
जलद सी - ४३ जलदराणी लक्ष्मीबाई चौक(सायन सर्कल)मुंब्रा पोलीस स्टेशनपूर्व गतिमार्ग, ठाणे - बेलापूर मार्ग
जलद सी - ४४ जलदसीप्झ (अंधेरी) पवार नगर आग्रा रोड
जलद सी - ४५ जलदघाटकोपर आगारब्रम्हांड मुलुंड रेल्वे स्थानक (प), आग्रा रोड
जलद सी - ४६ जलदमरोळ आगर लोधा पॅरॅडाइस पूर्व गतिमार्ग'
जलद सी - ६१ जलदमिरा रोड रेल्वे स्थानक (पू)महाराणा प्रताप चौक (मुलुंड चेकनाका)घोडबंदर रोड, मुलुंड रेल्वे स्थानक (प)
वातानुकूलितए एस ३०२माहीम बस स्थानककॅडबरी जंक्शन आग्रा रोड
मर्यादित३९९ मर्याट्रॉंम्बेमॅरेथॉन चौक आग्रा रोड
मर्यादित४५३ मर्यावडाळा आगारलोकमान्य टिळक नगरपूर्व गतिमार्ग, आग्रा रोड
वातानुकूलितए एस ४५८प्रबोधनकार ठाकरे नगर बस स्थानक(चारकोप)महाराणा प्रताप चौक (मुलुंड चेकनाका)घोडबंदर रोड, पश्चिम गतिमार्ग, घोडबंदर रोड
मर्यादित४८४ मर्याम्हाडा बस स्थानक - मुलुंड (पू) पवार नगरआग्रा रोड
मर्यादित४९१ मर्यासीप्झ (अंधेरी)/ मजास आगर ब्रम्हांडघोडबंदर रोड, पश्चिम गतिमार्ग
मर्यादित४९२ मर्यासीप्झ (अंधेरी)वाघबीळ गाव/ हिरानंदानी इस्टेट पातळीपाडा, ब्रम्हांड, घोडबंदर रोड, पूर्व गतिमार्ग, पवई
मर्यादित४९३ मर्याअणुशक्ती नगर दादलानी पार्क (बाळकुम)इ.एक्स.महामार्ग
मर्यादित४९४ मर्याविक्रोळी आगाररेतीबंदर (कळवा)पूर्व गतिमार्ग
सामान्य४९५गवाणपाडा (मुलुंड-पूर्व)ठाणे रेल्वे स्थानक (पूर्व) हरी ॐ नगर.मार्ग
मर्यादित४९६ मर्याआगरकर चौक(अंधेरी)मॅरेथॉन चौक आग्रा रोड
मर्यादित४९७ मर्याघाटकोपर आगारलोकमान्य टिळक नगर आग्रा रोड
मर्यादित४९९ मर्याघाटकोपर आगारवृंदावन सोसायटी आग्रा रोड
मर्यादित७०० मर्याबोरीवली रेल्वे स्थानक (पूर्व)ठाणे रेल्वे स्थानक (पूर्व)पूर्व गतिमार्ग, घोडबंदर रोड, पश्चिम गतिमार्ग
वातानुकूलितए एस ७००मागाठाणे आगार / बोरीवली रेल्वे स्थानक (पूर्व) ठाणे रेल्वे स्थानक (पूर्व)पूर्व गतिमार्ग, घोडबंदर रोड, पश्चिम गतिमार्ग []

नवी मुंबई महापालिका परिवहन (एन. एम. एम. टी.)

एन. एम. एम. टी.बस

ठाण्यातील चेंदणी कोळीवाड्यापासून सिडको बस स्टॉप [जवळ: वी.पी.म'स जोशी - बेडेकर महाविद्यालय, (ठाणे रेल्वेस्थानक - पश्चिम)] आणि तिथून ते नवी मुंबई अशी बससेवा नवी मुंबई परिवहन (एन. एम. एम. टी.) पुरवते. त्यांच्या बसेस ठाणे ते वाशी व नेरूळ, तसेच ऐरोली, तुर्भे या मार्गांवरही, धावतात. सगळे मार्ग कळवा ह्या रेल्वे स्थानकाजवळून् जातात.

एन. एम. एम. टी. ठाण्यात चालवते असे काही महत्त्वाचे बस मार्ग. []

बस प्रकार बस क्रमांक सुरुवात (ठाणे) शेवट मार्गे
सामान्यठाणे रेल्वे स्थानक (चेंदणी कोळीवाडा) वाशी रेल्वे स्थानक
सामान्यठाणे रेल्वे स्थानक (चेंदणी कोळीवाडा) दिवानगर सेक्टर १०
सामान्यठाणे रेल्वे स्थानक(चेंदणी कोळीवाडा) घणसोली मार्गे पटणी कॉम्प्युटर्स
सामान्यठाणे रेल्वे स्थानक (चेंदणी कोळीवाडा) वाशी सेक्टर ६
सामान्यठाणे रेल्वे स्थानक (चेंदणी कोळीवाडा) वाशी रेल्वे स्थानक मार्गे घणसोली
सामान्य११ ठाणे रेल्वे स्थानक (चेंदणी कोळीवाडा) वाशी रेल्वे स्थानक मार्गे एम.आय.डी.सी
सामान्य१२ ठाणे रेल्वे स्थानक (चेंदणी कोळीवाडा) महापे बस स्टॅन्ड
सामान्य१७ ओवलेदिवानगर ठाणे रेल्वे स्थानक (चेंदणी कोळीवाडा)
सामान्य२६ठाणे रेल्वे स्थानक (चेंदणी कोळीवाडा)खारघर (जलवायु विहार)
सामान्य२७ठाणे रेल्वे स्थानक (चेंदणी कोळीवाडा) करावे सेक्टर ४६/४८
सामान्य२८ठाणे रेल्वे स्थानक (चेंदणी कोळीवाडा) सी.बी.डी (आर्टिस्ट कॉलनी) मार्गे एम.आय.डी.सी
सामान्य२९ठाणे रेल्वे स्थानक (चेंदणी कोळीवाडा) खारघर (जलवायु विहार) मार्गे नेरूळ (पूर्व)
सामान्य३४ठाणे रेल्वे स्थानक (चेंदणी कोळीवाडा) करावे सेक्टर ४६/४८ मार्गे नेरूळ (पश्चिम)
सामान्य७०वाशी रेल्वे स्थानकभायंदर रेल्वे स्थानक मार्गे घोडबंदर रोड, ठाणे रेल्वे स्थानक (चेंदणी कोळीवाडा)

कल्याण - डोंबिवली महापालिका परिवहन (के.डी.एम.टी)

के.डी.एम.टी बस

कल्याण - डोंबिवली महापालिका परिवहन (के.डी.एम.टी) ने एकमेव बस सेवेची सुरुवात केली आहे. ही बस ऑक्टोबर २००९ पासून धावते.

बस प्रकार बस क्रमांक सुरुवात शेवट (ठाणे) मार्गे
सामान्य१७ कल्याण रेल्वे स्थानक (प)तीन-हात नाका (मॅरेथॉन चौक)आग्रा रोड []

मीरा भाईंदर महापालिका परिवहन (एम.बी.एम.टी.)

मीरा भाईंदर महापालिका परिवहन ही सर्वात नवीन परिवहन सेवा आहे. त्यांची बस दहिसर चेकनाका ते वर्सोवा [ठाणे] चेकनाका अशी सेवा पुरवते. त्यांचा एक बसमार्ग मीरा-भाईंदर शहरातून दहिसर चेकनाक्यामार्गे ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत जातो.

बस प्रकार बस क्रमांक सुरुवात शेवट (ठाणे) मार्गे
सामान्य भायंदर रेल्वे स्थानक (प)घोडबंदर गाव काशीमिरा[]
मर्यादित१० मर्याभायंदर रेल्वे स्थानक (प) ठाणे रेल्वे स्थानक (पू.) घोडबंदर रोड
सामान्य २९मिरा रोड रेल्वे स्थानक (प)मॅरेथॉन चौक घोडबंदर रोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (एस.टी.) [एम.एस.आर.टी.]

एमएसआरटीसी बस
एमएसआरटीसी बस

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (एस टी.) ठाणे ते बोरीवली, भायंदर, पनवेल ह्या मध्यम पल्ल्याच्या सेवा आणि इतर शहरांसाठी लांब पल्ल्याच्या बससेवा पुरवते.

आगार वाहतूक प्रकार ठिकाण बस मार्ग
ठाणे रेल्वे स्थानकएशियाड
एस.टी. सामान्य
ठाणे रेल्वे स्थानक पश्चिमबोरीवली, भायंदर, भिवंडी, नालासोपारा, पनवेल
वंदना टॉकीजशिवनेरी
एशियाड
एस.टी. सामान्य
३ पेट्रोल पंप, हरिनिवास सर्कलजवळपुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बेळगाव, हुबळी, कारवार, हैद्राबाद, बंगळूर, गोवा
खोपटएशियाड
एस.टी. सामान्य
खोपट, जवळ कैडबरी जंक्शननाशिक, शिर्डी, धुळे, औरंगाबाद, जळगाव, रत्‍नागिरी, मालवण, अलिबाग, बडोदा, सूरत, अहमदाबाद

खासगी वाहतूक व्यवस्था

येवढ्या विविध प्रकारच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असतानाही, मोठमोठ्या रहिवासी संकुलांची यांची खासगी वाहतूक व्यवस्था आहे. या खासगी बससेवेचे थांबे ठाणे स्थानकाच्या दोन्ही बाजूला आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी असल्यामुळेच ही खासगी बससेवा अजून अस्तित्वात आहे.

ऑटो रिक्षा

ऑटो रिक्षाचे मीटर भाड़े पहिल्या १.६ किलोमीटरला १० रुपये आहे. पुढे त्याचा दर थोडा कमी आहे. ठाणे शहरात प्रवास करण्यास ऑटो रिक्षा हा मस्त व स्वस्त पर्याय आहे. ठाणे शहरातील रुंद रस्त्यांखेरीज लहानलहान रस्त्यांनी धावत असल्याने रिक्षाने ठाण्यातल्या ठाण्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लवकर पोचता येते. स्थानिक ऑटो रिक्षा फक्त ठाणे शहराच्या हद्दीत चालते, म्हणजे या रिक्षात बसून टोलनाका ओलांडून दुसऱ्या शहरात प्रवेश करता येत नाही. मुंबई (मुलुंड)च्या दिशेने प्रवास करायचा असेल तर मुलुंड चेक नाक्याला रिक्षा बदलून मुंबई उपनगरात धावणारी रिक्षा घ्यावी लागते. मुलुंड चेक नाके दोन आहेत, एक आग्रा रोडवर आणि दुसरा पूर्व गतिमार्गावर.

टॅक्सी

नाशिक, पुणे व मुंबई या शहरातील काही एका ठरावीक ठिकाणापर्यंत जाण्यासाठी परवानाप्राप्त खासगी टॅक्सी हा एक पर्याय आहे. ठाणे शहराजवळच्या मुंबई विमानतळाला जाण्यासाठी खासगी टॅक्सी मिळतात. ठाण्यातले मुख्य खासगी टॅक्सी स्टॅन्ड खालील ठिकाणी आहेत.

१) ठाणे रेल्वे स्थानक (पश्चिम) २) मुलुंड - ठाणे चेक नाका (लाल बहादुर शास्त्री मार्ग-आग्रा रोडवरील)

वातानुकूलित टॅक्सी

वेगवेगळ्या खासगी वातानुकूलित टॅक्सी ठाणे शहरात आपली सेवा देतात. मुख्य खासगी वातानुकूलित टॅक्सी सेवा खालीलप्रमाणे.

  • कूल कॅब्ज़
  • मेरू
  • मेगा कॅब्ज़

या टॅक्सीने ठाणे शहरातील घरापासून ते मुंबई विमानतळाला वा पुणे-नाशिक-सुरत सारख्या जवळच्या शहराला जाता येते. या खासगी वातानुकूलित टॅक्सीला दूरध्वनी करून घरी किंवा कुठेही बोलावता येते.

ठाणे शहराला जोडणारे रस्ते

ठाणे हे मुंबईला जानारया मुख्य द्वार मार्गात ५ पैकी २ मर्गाची सुरुवात होते. द इएसटर्न एक्सप्रेस हाईवे (राषट्रीय महामार्ग ३) व लाल बहादुर शास्त्री मार्ग . (बाकि तीन (३) गोरेगांव लिंक रोड मार्गे नवी-मुंबई,चेम्बूर आणि दहिसर).

घोड़बंदर रोड हा ठाण्याला व पूर्व मुंबईला, पशिम मुंबईला जसे बोरीवली व मीरा रोडला जोडनारा एक मुख्य मार्ग आहे. आगरा रोड हा कल्याण, भिवंडी व डोम्बिवली या शहरा कड़ जाणारे एक मुख्य मार्ग आहे.

वाहतूक समस्या

ठाणे शहरातील वाहतुकीचे भविष्य

लाइट रेल सेवा ४२ क.मी.च्या लम्बिची असणार व ही योजना तीन (३) तप्यात पूर्ण करन्यंत येईल. पहिला तप्पा हा बालकुम आणि कोल्शेत मार्गे नौपाडा आसा असेल अणि अंतर असेल १६.०५ क.मी. या तप्प्यत १४.६५ क.मी. जमीनी पासून वर्ती असेल तर फक्त १.४ क.मी. जमीनी वर असेल. अणि त्याला ११ स्तानक असतील. []

ठाणे शहरात मेट्रो रेल सेवा शुरू करण्याची योजना आहे पण ही योजना आता प्राथमिक विचारत आहे. मेट्रो विषयी कुठलेही कार्यत सुरुवात झाली नाही. परंतु ठाणे महानगरपालिकेने रिंगरूट प्रकल्पासाठी म्हणजेच अंतर्गत मेट्रो प्रकल्पासाठी प्रस्तावित केलेल्या प्रकल्पांसह नाशिक निओ मेट्रो आणि नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा लवकरच घेतला जाईल, अशी माहिती केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी लोकसभेत दिली.[]

संदर्भ

  1. ^ a b "संग्रहित प्रत". 2008-11-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-04-20 रोजी पाहिले.
  2. ^ "संग्रहित प्रत". 2008-11-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-04-20 रोजी पाहिले.
  3. ^ http://www.bestundertaking.com/TravelAsYouLike-Ticket.pdf [मृत दुवा] विदागारातील आवृत्ती
  4. ^ Mumbai Mirror report (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर) Retrieved 2009-04-27
  5. ^ http://www.nmmt.in/routedetail.php
  6. ^ [१]
  7. ^ "Mira-Road.com - Know your Town Better". 2010-03-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-05-02 रोजी पाहिले.
  8. ^ Times of India report[permanent dead link]
  9. ^ "Thane Metro News : ठाणे शहराच्या अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला". The GNP Marathi Times. 2022-02-13. 2022-02-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-02-13 रोजी पाहिले.