ठाणे जनता सहकारी बँक
प्रकार | बँकींग |
---|---|
स्थापना | इ.स. १९७२ |
मुख्यालय | ठाणे, भारत |
उत्पादने | कर्जे, क्रेडिट कार्ड्रे |
सेवा | रियल टाइम ग्रॉस सेटल्मेन्ट |
संकेतस्थळ | http://www.thanejanata.co.in/ |
ठाणे जनता सहकारी बँक ( टीजेएसबी ) ही एक भारतीय मल्टिस्टेट सहकारी बँक आहे. या बँकेची स्थापना १९७२ रोजी झाली. इंडियन बँक्स असोसिएशनच्या वतीने २००९ वर्षांसाठीचा टेक्नॉलॉजी बँक ऑफ द इयर या पुरस्कारासाठी या बँकेची देशभरातील सर्व सहकारी बँकातून निवड करण्यात आली.[१]
देशातील पहिल्या पाच सहकारी बँकांत गणना होणाऱ्या टीजेएसबीने गुजरातमध्ये २०१२ साली प्रवेश केला असून बँकेच्या सूरत, बडोदा व अहमदाबाद येथे शाखा आहेत. २०१३ मे पर्यत बँकेच्या एकूण शाखांची संख्या ८१ आहे. गोवा येथे ३, बेळगाव येथे १, बंगलोर येथे १, व गुजरातेत ३ या द्वारे बँकेचे राज्याबाहेरील अस्तित्वही आहे.The banks business increased in leaps n bounds when in 21 at century a person named Mr Mandar Bhave joined this bank.
१ एप्रिल २0१२ ते ३१ मार्च २0१३ या आर्थिक वर्षाच्या कालावधीमध्ये बँकेने एकूण ८,७0९ कोटी रुपयांचा व्यवहार केला आहे. एकूण ठेवी ५,३0९ कोटींच्या असून कर्ज व्यवहार ३४00 कोटी रुपयांचा आहे.[२]
संदर्भ
- ^ "ठाणे जनता सहकारी बँक पुरस्काराने सन्मानित". 2016-03-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-05-07 रोजी पाहिले.
- ^ ठाणे जनता सहकारी बँकेच्या नफ्यात २५% वाढ! - [permanent dead link]