Jump to content

ठाणाळे लेणी

ठाणाळे लेणी
नाडसूर लेणी स्तूप
Map showing the location of ठाणाळे लेणी
Map showing the location of ठाणाळे लेणी
स्थानसुधागड रायगड
18°34′9.714″N 73°19′8.9832″E / 18.56936500°N 73.319162000°E / 18.56936500; 73.319162000
शोध इ.स. पू दुसरे शतक
गुहा दर्शवा ६४ बौद्धलेणी

ठाणाले लेणी किंवा नाडसूर लेणी हा २३ बौद्ध लेण्यांचा समूह रायगड जिल्हातील, पालीपासून १८ किलोमीटर अंतरावर सुधागड येथे आहे.[]

या लेणी साधारण आहेत आणि इ.स.पू. पहिल्या शतकातील आहेत. यामध्ये दोन चैत्य, दोन स्तूप आणि बाकीचे विहार आहेत. अलीकडच्या काळात ब्रिटिशांशी लढताना वासुदेव बळवंत फडके यांनी या लेण्यांमध्ये आश्रय घेतला होता.

या लेण्यांमध्ये बौद्ध स्थापत्याचा प्रभाव दिसतो. त्यातील काही शिल्पे सुबक असून काही पूर्णावस्थेत नाहीत असेही दिसते. लेण्यांतील चैत्यविहाराच्या छतावर अप्रतिम नक्षीकाम आहे.[]

शोध

हा तेवीस लेण्याचा समूह सर्वप्रथम मराठी मिशन मुंबई यांनी जानेवारी इ.स.१८९० मध्ये पाहिला आणि तत्कालीन सुप्रसिद्ध पुरातत्त्व तज्ज्ञ हेन्री कझिन्स या संशोधकाच्या नजरेसमोर आणल्यामुळे कझिन्सने त्याच वर्षी ठाणाळे लेण्यांना भेट दिली आणि इ.स.१९११ मध्ये त्याने "नाडसूर आणि खडसामला लेणी(Caves at Nadasur and Kharasamla) हे पुस्तक प्रकाशित केले. खडसामला किंवा खडसांबळे लेणी(नेणावली लेणी) समूह ठाणाळे लेणीच्या दक्षिणेस नऊ किमी अंतरावर आहे. ठाणाळ या शब्दामधील ठाण म्हणजे स्थान अर्थात 'पूजास्थान' असा केला जातो.[]

रचना

येथील सर्व लेणी पश्चिमभिमुख आहेत. या बौद्ध लेण्यांमध्ये एक चैत्यगृह, एक स्मारक स्तूप व एकवीस निवासी गुंफा आहेत. इ.स.पू. दुसऱ्या शतकात ठाणाळे लेण्याची निर्मिती झाली असावी.[]

कसे जाल ?

पाली गावापासून ठाणाळे गाव नाडसूर मार्गे सुमारे २५ किमी अंतरावर आहे. ठाणाळे गावाच्या पूर्वेला घनदाट अरण्यात ही लेणी कोरलेली आहेत. पाली गावातून स्थानिक एस.टी.चा किंवा रिक्षाचा प्रवास करावा लागतो. ठाणले गावातून मात्र पुढे पायवाटेने सुमारे दीड तासांची पायपीट करून लेण्यांपर्यंत पोहोचता येते. रानात चकव्या वाटा पुष्कळ आहेत.म्हणून गावातून वाटाड्या सोबत घेणे उत्तम.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Ahir, D. C. (2003). Buddhist sites and shrines in India : history, art, and architecture (1. ed.). Delhi: Sri Satguru Publ. pp. 201–201. ISBN 8170307740.
  2. ^ "ठाणाळे लेणी". Loksatta. 2014-11-05. 2018-08-28 रोजी पाहिले.
  3. ^ Administrator. "ठाणाळ लेणी". Marathi World (इंग्रजी भाषेत). 2018-08-28 रोजी पाहिले.
  4. ^ Administrator. "ठाणाळ लेणी". Marathi World (इंग्रजी भाषेत). 2018-08-28 रोजी पाहिले.