ट्विट
ट्विट म्हणजे ट्विटर या अमेरिकन समाजमाध्यमावरील पोस्ट (प्रकाशन) असते. यामध्ये पोस्ट केलेला कोणताही संदेश ज्यामध्ये फोटो, व्हिडिओ, लिंक्स आणि मजकूर असू शकतो.[१] वापरकर्त्याच्या प्रोफाइलवर पोस्ट करण्यासाठी ट्वीट बटण दिलेले असते.
ट्वीट लिहिण्याच्या क्रियेला ट्वीट करणे किंवा twittering असे म्हणतात. ट्विट्स हे स्पेससह १४० वर्णांपर्यंत लांब असू शकतात. यामध्ये URL (संकेतस्थळ) आणि हॅशटॅग समाविष्ट असू शकतात. 140-वर्ण मर्यादा लघु संदेश सेवेसाठी (SMS) आवश्यक असलेल्या 160-वर्ण मर्यादेपासून येते. (ट्विटरने इतर 20 वर्ण वापरकर्तानावांसाठी राखून ठेवले आहेत.)
संदर्भ
- ^ "New user FAQ". help.twitter.com (इंग्रजी भाषेत). 2022-06-07 रोजी पाहिले.