ट्युडोर घराणे
ट्युडोर घराणे (इंग्लिश: Tudor dynasty) हे मूलतः वेल्श असलेले युरोपीय राजघराणे होते. या राजघराण्याने इ.स. १४८५ ते इ.स. १६०३ सालांदरम्यान इंग्लंडाचे राज्य व आयर्लंडाचे राज्य यांच्यावर सत्ता गाजवली.
ट्युडोर राज्यकर्ते
ट्युडोर राजघराण्यातील खालील सहा राज्यकर्त्यांनी इंग्लंडावर राज्य केले:
चित्र | नाव | जन्मदिनांक | राज्यारोहण दिनांक | मृत्युदिनांक |
---|---|---|---|---|
सातवा हेन्री | २८ जानेवारी, इ.स. १४५७ | २२ ऑगस्ट इ.स. १४८५ | २१ एप्रिल, इ.स. १५०९ | |
आठवा हेन्री | २८ जून, इ.स. १४९१ | २१ एप्रिल, इ.स. १५०९ | २८ जानेवारी, इ.स. १५४७ | |
सहावा एडवर्ड | १२ ऑक्टोबर, इ.स. १५३७ | २८ जानेवारी, इ.स. १५४७ | ६ जुलै, इ.स. १५५३ | |
लेडी जेन ग्रे (विवादास्पद) | इ.स. १५३७ | १० जुलै, इ.स. १५५३ | १२ फेब्रुवारी, इ.स. १५५४ (मृत्युदंड) | |
पहिली मेरी | १८ फेब्रुवारी, इ.स. १५१६ | १९ जुलै, इ.स. १५५३ | १८ नोव्हेंबर, इ.स. १५५८ | |
पहिली एलिझाबेथ | ७ सप्टेंबर, इ.स. १५३३ | १७ नोव्हेंबर, इ.स. १५५८ | २४ मार्च, इ.स. १६०३ |
बाह्य दुवे
- ट्युडोर हिस्टरी.ऑर्ग (इंग्लिश मजकूर)