Jump to content

टोस्टमास्टर्स इंटरनॅशनल

भारताचा पहिला हिंदी बोलणारा क्लब, सृजन हिंदी टोस्टमास्टर्स, पुणे

टोस्टमास्टर्स इंटरनॅशनल ही एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. ती लोकांतील वक्तृत्वशक्ती व नेतृत्वशक्ती वाढवण्याचा प्रयत्न करते. या संघटनेच्या जगभरात हजारो शाखा आहेत. या शाखांमध्ये सदस्य नियमितपणे एकत्र येऊन वक्तृत्वाचा सराव करतात. टोस्टमास्टर्स इंटरनॅशनलची स्थापना १९२४ मध्ये अमेरिकेत झाली. संघटनेच्या महाराष्ट्रासकट इतर भारतात अनेक शाखा आहेत. टोस्टमास्टर्स इंटरनॅशनलचे कार्य इंग्लिशमध्येच असते, परंतु टोस्टमास्टर्स इंटरनॅशनलसारख्या संघटना इतर भाषात तयार होऊ लागल्या आहेत. त्यात चिनी भाषाजर्मन प्रमुख आहेत. भारतात हिंदी व तमिळमध्ये टोस्टमास्टर्सची संघटना सुरू करण्यात आली आहे. मराठीत अशी संघटना नाही.