Jump to content

टोमॅटोची कोशिंबीर

टोमॅटो जगात अनेक ठिकाणी कच्चा खाण्यात वापरला जातो. हा पूर्ण पिकल्यावरही कोशिंबीरीत खाल्ला जातो आणि कच्चा असतानाही खाल्ला जातो. दोन्ही कृतीत याची चव निराळी असते.

इतिहास

मानवाला टोमॅटो चिरून खाण्याचे कधी लक्षात या विषयी नेमकी माहिती आढळत नाही. परंतु भारतीय साहित्यात सुमारे अठराव्या शतकापासून कोशिंबीरीचे उल्लेख आढळतात. महाराष्ट्र राज्यात कोशिंबीर करण्याच्या अनेक पद्धती आहेत. ही गोड, तिखट किंवा मिश्र चवीचीही बनवली जाते. काहीवेळा कोशिंबीरीस मोहरी वापरून फोडणी ही दिली जाते. मिश्र चवीची कोशिंबीर करण्याची पद्धती खालील प्रमाणे आहे. या कृतीमध्ये टोमॅटो परतला जात नाही तर गरम फोडणीचे तेल चिरलेल्या टोमॅटोवर घातले जाते. यामुळे टोमॅटो शिजत नाही पण फोडणी मात्र बसते. ही मराठी पाककृती आहे.

साहित्य

बारीक चिरलेले ३ टोमॅटो, बारीक चिरलेला १ कांदा, तिखट, मीठ, साखर, तेल, मोहरी, हिंग, हळद, भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट

कृती

  1. एका पसरट कुंड्यात / पातेल्यात कांदा आणि टोमॅटो एकत्र करून घ्या.
  2. त्यात चवीनुसार तिखट, मीठ, साखर घाला. दाण्याचा कूट घाला.
  3. एका कढल्यात/लोखंडी पळीत / छोट्या कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करून घ्या.
  4. ही फोडणी कांदा, टोमॅटोच्या मिश्रणावर घाला. टोमॅटोची कोशिंबीर तयार.