Jump to content

टोपली

बांबूपासून विणलेली विकण्यास ठेवलेली भारतातल्या बंगलोरच्या बाजारातील टोपली.

टोपली बांबूपासून तयार केलेले प्राचीन उपकरण आहे. बांबू तासून त्याच्या पट्ट्या करून त्यापासून टोपली तयार करतात. त्याचे अनेक प्रकार व आकार बनवता येतात. टोपली, डालग, छोट्या-मोठ्या टोपल्या हे त्याचे प्रकार आहेत. आकाराप्रमाणे टोपली कशाला वापरतात ते ठरवले जाते. ग्रामीण भागात टोपलीमध्ये जेवण ठेवण्याची पद्धत आहे. त्यात भाकरी ठेवली जाते. त्यात इतर वस्तूही ठेवू शकतो. ग्रामीण भागात याचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. मोठे सामान भरून टोपली चुंबळावर ठेवून डोक्यावर ठेवली जाते. आधुनिक काळात छोट्याशा टोपलीत हॉटेलात पोळ्या दिल्या जातात. टोपली दीर्घकाळ टिकावी म्हणून ग्रामीण भागात शेणाने सारवली जातात.