टोनी मॉरिसन
टोनी मॉरिसन (१८ फेब्रुवारी, इ.स. १९३१:लोरेन, ओहायो - ) ही एक अमेरिकन लेखिका आहे. वंशाने आफ्रिकन अमेरिकन असलेल्या मॉरिसनने आजवर अनेक प्रसिद्ध कादंबऱ्या लिहिल्या आहेत. तिच्या साहित्यामधील योगदानासाठी मॉरिसनला १९८८ साली पुलित्झर पुरस्कार तर १९९३ साली साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले.
हिचे जन्मनाव क्लोए आर्डेलिया वॉफर्ड आहे.
मॉरिसन अमेरिकेच्या प्रिन्स्टन विद्यापीठामध्ये साहित्याची प्राध्यापिका आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
मागील डेरेक वॉलकॉट | साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते १९९३ | पुढील केन्झाबुरो ओए |