Jump to content

टॅव्हर्नियर ब्लू

टॅव्हर्नियर ब्लू हा ११५.१६ कॅरेट्स वजनाचा हिरा होता. हा हिरा मूळतः भारतीय होता आणि संभाव्यतः १६६६ मध्ये आंध्र प्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यातील कोल्लूर खाणीत सापडला होता. फ्रेंच रत्न व्यापारी आणि प्रवासी जीन-बॅप्टिस्ट टॅव्हर्नियर यांनी तो फ्रान्सच्या लुई चौदाव्याला विकला.