Jump to content

टॅन्टॅलस

ग्रीक पुराणकथांमध्ये सांगितल्याप्रमाणे टॅन्टॅलस हा आशिया मायनरमधील सिपिलसचा (काहींच्या मते पॅफलेगोनियाचा) राजा होता. हा जरी मर्त्य माणूस असला तरी देव त्याला आपल्याबरोबर पंक्तीला घेत असत.

टॅन्टॅलस हा झ्यूसचा पुत्र होता. त्याच्या आईचे नाव प्लूटो होते. ती हिमासची कन्या होती.टॅनॅलसचे ॲटलासची मुलगी डायोनेशी झाले होते. त्यांना नायोबी ही कन्या आणि ब्रॉटियास आणि पेलॉप्स हे दोन पुत्र होते.

देवांना फसवून टॅन्टॅलसने त्यांना, आपला पुत्र पेलॉप्सचे मांस खायला घातले, आणि देवांचा रोष ओढवून घेतला. त्याची शिक्षा म्हणून देवांनी त्याला टारटॅरस नावाच्या नरकात टाकले आणि गुढघाभर पाण्यात उभे केले. डोक्यावर फळे टांगली होती. पण पाणी प्यायला गेला की पाणी नाहीसे होत असे आणि फळे खाण्याचा प्रयत्न केला की ती वाऱ्याने दूर जात असत.

टॅन्टॅलसची मुलगी नायोबी हिला सात पुत्र आणि सात कन्या होत्या. झ्यूसच्या लेटो नावाच्या पत्नीस फक्त एक पुत्र (अपोलो), आणि एक कन्या (आर्टेमिस) होती. नायोबीने यावरून एकदा लेटोला खिजवले. तेव्हा अपोलो आणि आर्टेमिसने तिच्या सर्व पुत्रांना बाणांनी ठार केले.सिपिलस पर्वतावर अश्रू ढाळता ढाळता नायोबीचे दगडी स्तंभात रूपान्तर झाले. मात्र त्या स्तंभातूनही तिचे अश्रू झरतच राहिले.

सिपिलस पर्वतावर एक कातळ आहे. तो बर्फाच्छादित असतो, पण बर्फ वितळू लागले की त्याच्या विशिष्ट आकारामुळे, तो अश्रू ढाळणाऱ्या स्त्रीसारखा तांबूस दिसतो.