Jump to content

टीना तांबे

टीना तांबे
जन्म टीना देवळे
१८ जुन, १९७७
इंदूर, मध्यप्रदेश
निवासस्थान मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण नृत्य अलंकार(कथक), एम. ए. (नृत्य), बी.एस .सी. आणि डिप्लोमा इन इंटिरियर डिसाईनिंग
पेशा कथक नृत्यांगना, नृत्य दिग्दर्शिका आणि नटी
पुरस्कार नालंदा नृत्य निपुण पुरस्कार, सिंगारमणि, पंडित कार्तिकराम कलानिधी पुरस्कार, कुमार सानू संगीत पुरस्कार
संकेतस्थळ
www.tinatambe.com

टीना तांबे ह्या जयपूर-अत्रौली घराणे शैलीच्या कथक नृत्यांगना तथा कोरिओग्राफर आहेत.[] तांबे या गुरू उमा डोगरा यांच्या प्रमुख शिष्यांपैकी एक आहेत. त्या वयाच्या सहाव्या वर्षापासून कथक नृत्य करत आहेत. त्या कथक नृत्याचे शिक्षण देतात. तसेच कथक नृत्यांचे दिग्दर्शनसुद्धा करतात. त्यांनी देशातल्या अनेक प्रमुख नृत्य महोत्सवात आणि अंतरराष्ट्रीय पातळीवर नृत्याविष्कार केले आहे. तांबे यांना इ.स. २००९ मध्ये नालंदा डांस एंड रिसर्च अकादमी, मुंबई द्वारा नालंदा नृत्य निपुण उपाधिने सन्मानित करण्यात आले होते.[][][][][][][][][१०][११]

व्यक्तिगत जीवन

टिना तांबे यांचा जन्म इंदूर (मध्य प्रदेश) येथे झाला. त्यांच्या आईचे नाव कुमुदिनी आणि वडिलांचे नाव अशोक देवळे आहे. तांबे यांनी कथक नृत्याची प्रारंभिक शिक्षा पुरु दधीचच्या शिष्या रंजना ठाकूर यांच्याशी घेतली आणि सुचित्रा हरमळकर यांचा निदर्शनात एम ए (नृत्य) पदवी मिळवली. नंतर संस्कृती विभाग (भारत सरकार)ची शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी कथकची प्रगत शिक्षा गुरू उमा डोगरा यांच्याशी मुंबई येथे घेतली. 'मीरा (कृष्णभक्त) के काव्य में नृत्य तत्त्व - कथक के संदर्भ में' विषया वर त्यांचा संशोधना साठी त्यांना विक्रम विद्यापीठ, उज्जैन कडून डॉक्टरेटची उपाधी देण्यात आली. टीना यांनी देवी अहिल्या विद्यापीठ, इंदूर मधून विज्ञान मध्ये पदवी आणि आंतरिक साजसज्जाचा डिप्लोमा देखील  केला आहे.   

पुरस्कार आणि सन्मान

  • वर्ष १९९८, १९९९, २००० आणि २००१ च्या दरम्यान त्यांनी देवी अहिल्या विद्यापीठ चं प्रतिनिधित्व करून असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीस (AIU)च्या युथ फेस्टिवल मध्ये एकल नृत्य प्रतियोगितेत राज्य, झोन आणि राष्ट्रीय पातळी वर अनेक पुरस्कार पटकावले.
  • मध्यप्रदेश प्रेस क्लब द्वारा मध्य प्रदेश रत्न पुरस्कार, २०२२[१२][१३]
  • कार्तिक कला अकादमी, इंदौर, द्वारा इ.स. २०१६ साली कार्तिकराम कलानिधि पुरस्कार
  • २००९ मध्ये नालंदा नृत्य निपुण पुरस्कार
  • २००३ मध्ये सिंगारमणी पुरस्कार

संदर्भ

  1. ^ Dave, Ranjana (2016-05-04). "Showcasing the nuance in dance" (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X.
  2. ^ Tave, Ranjana (४ मे २०१६). "Showcasing the nuance in dance". द हिन्दू.
  3. ^ "संग्रहीत प्रति" मैंने मीरा के गीतों में नृत्य की असीम संभावनाएं खोजीं. दैनिक भास्कर. १२ जून २०१८. २६ जुलै २०१९ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २६ जुलै २०१९ रोजी पाहिले.
  4. ^ Tiwari, Shashiprabha (१२ ऑगस्ट २०१६). "संग्रहीत प्रति" नृत्यः ए री सखी आज घेर लो श्याम को. जनसत्ता. २६ जुलै २०१९ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २६ जुलै २०१९ रोजी पाहिले.
  5. ^ "Dance: Shades of Kathak Tina Tambe". wp.nehrucentre.org.uk. १३ मार्च २०१२. २ ऑगस्ट २०१८ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २६ जुलै २०१९ रोजी पाहिले.
  6. ^ टीना की लन्दन में कत्थक प्रस्तुति. नई दुनिया. दैनिक जागरण. ३० मार्च २०१२. २६ जुलै २०१९ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २६ जुलै २०१९ रोजी पाहिले.
  7. ^ "India's one of accomplished dancers, Dr. Tina Tambe presents a Kathak recital". The Sunday Times Sri Lanka. 2021-12-31 रोजी पाहिले.
  8. ^ "मैंने मीरा के गीतों में नृत्य की असीम संभावनाएं खोजीं". दैनिक भास्कर. २६ जुलै २०१९ रोजी मूळ पानापासून संग्रहित.
  9. ^ "Kathak recital by Dr Tina Tambe".
  10. ^ "Dr. Tina Tambe | Bollywood Festival". web.archive.org. 2019-07-26. 2019-07-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-08-28 रोजी पाहिले.
  11. ^ Kumar, Bhanu (2019-06-27). "Kalaarpan Festival — focus on Kathak" (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X.
  12. ^ "कथक नृत्यांगना टीना ताम्बे को "मध्यप्रदेश रत्न" पुरस्कार". ClassicalClaps.com. २६ एप्रिल २०२२. २६ एप्रिल २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ८ मे २०२२ रोजी पाहिले.
  13. ^ "मप्रः नई पीढ़ी को कर्तव्य बोध का अहसास कराने में पत्रकारिता की भूमिका महत्वपूर्ण : पटेल - हिन्दुस्थान समाचार". हिन्दुस्थान समाचार. २५ एप्रिल २०२२. २३ नोव्हेंबर २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २३ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.

बाह्य दुवे