टीटवाल
टीटवाल, टिथवाल किंवा तिथवाल हे भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील छोटे गाव आहे. हे कुपवाडा जिल्ह्यात किशनगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. कुपवाडापासून ८२ किमी अंतरावर असलेले हे गाव पाकिस्तान-प्रशासित काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळ [१] आहे. टीटवाल हे तंगधर मार्गे उर्वरित भारताशी जोडलेले आहे.
१९४७ च्या भारताच्या फाळणीपूर्वी, टीटवाल हे एक व्यापाराचे केंद्र होते. [२]
टीटवाल हे गाव भारतात नियंत्रण रेषेवर (एलओसी) स्थित आहे. ही रेषा भारताच्या जम्मू आणि काश्मीरला काश्मीर राज्याला पाकिस्तानने बळकावलेल्या भागांपासून वेगळे करते. १९४९ च्या भारत पाकिस्तान करारानुसार नियंत्रण रेषेच्या दोन्हीकडे ५०० यार्डच्या आत कोणत्याही बांधकामास परवानगी नाही आणि हा "नो कन्स्ट्रक्शन झोन" "नो मॅन्स लँड" मानला जातो. येथे दोन्ही देशांनी आपापल्या बाजूला भूसुरुंग पेरलेले आहेत. भारताने नियंत्रण रेषेवर ७३४ किमी लांबीची घुसखोरी प्रतिबंधक यंत्रणा तयार केली आहे. [२]
एकूण | पुरुष | स्त्री | |
---|---|---|---|
लोकसंख्या | १०३५ | ५४९ | ४८६ |
६ वर्षाखालील मुले | १९३ | 104 | ८९ |
अनुसूचित जाती | 0 | 0 | 0 |
अनुसूचित जमाती | 103 | ५१ | 52 |
साक्षरता | 73.75% | ८९.८९% | ५५.६७% |
कामगार (सर्व) | 235 | 211 | २४ |
मुख्य कामगार (एकूण) | 161 | - | - |
किरकोळ कामगार (एकूण) | ७४ | ७१ | 3 |
संदर्भ
- ^ "340km LoC road to put vales on tourism map | India News - Times of India". The Times of India.
- ^ a b On the wrong side of fence, The Caravan, 01 April 2021.