टाहो सरोवर
टाहो सरोवर Lake Tahoe स | |
---|---|
स्थान | उत्तर अमेरिका |
गुणक: 39°5′N 120°02′W / 39.083°N 120.033°W | |
भोवतालचे देश | अमेरिका |
कमाल लांबी | ३५ |
कमाल रुंदी | १९ |
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ | ४९६.२ |
सरासरी खोली | ३०० |
कमाल खोली | ५०१ |
पाण्याचे घनफळ | १५०.६८ घन किमी |
किनार्याची लांबी | ११४ |
उंची | १,८९७ |
टाहो सरोवर हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या सियेरा नेव्हाडा पर्वतरांगेमधील एक मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. हे सरोवर नेव्हाडा व कॅलिफोर्निया राज्यांच्या सीमेवर रिनो व साक्रामेंटो ह्या शहरांच्या मधोमध स्थित असून ते उत्तर अमेरिकेमधील सर्वात उंच सरोवर आहे. घनफळाच्या दृष्टीने ते जगातील २६व्या क्रमांकाचे मोठे सरोवर आहे.
टाहो सरोवर हे ह्या भागातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ असून येथील अनेक स्की रिझॉर्ट्स प्रसिद्ध आहेत. १९६० हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा येथील स्क्वा व्हॅली ह्या ठिकाणी खेळवण्यात आल्या होत्या.
हे सुद्धा पहा
- रिनो-लेक टाहो आंतरराष्ट्रीय विमानतळ
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत