टाकवे (शिराळा)
?टाकवे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | शिराळा |
जिल्हा | सांगली जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
टाकवे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
लोकजीवन
येथील लोकजीवनावर ग्रामीण तसेच शहरी भागातील राहणीमानाचा प्रभाव आढळून येतो, येथील लोक जास्त प्रमाणत शेती करतात गावात छोटे मोठे व्यवसाय देखील केले जातात, गावात वेगवेगळ्या समजाची लोक असून एकोप्याने जीवन व्यतीत करतात, वर्षाकाठी गावची जत्रा असते, त्यानिमित्ताने सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन मोठा उत्सव साजरा करतात. गावामधे काळाम्मादेवी ही ग्रामदेवता तसेच श्री भैरवनाथ हे ग्रामदैवत आहे. त्याचप्रमाणे गणपती, लक्ष्मी,मारुती अशी मंदिरे देखील आहेत. गावामधे सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. तसेच गावातील एकोपा आज ही मोठ्या प्रमाणात दिसून येतो.
प्रेक्षणीय स्थळे
गावामधे प्रेक्षणीय स्थळे आहेत
काळाम्मादेवी मंदिर - हे छोट्याश्या नदिकडेला वसलेले एक सुंदर असे मंदिर आहे निसर्गरम्य वाटणाऱ्या अश्या थंड ठिकाणी हवेहवेसे वाटते,नवसाला पावणारी देवता असे या देवीला मानले जाते, दरवर्षी गावातील सुवासिनी,श्रद्धाळू,गावकरी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. आसपासच्या गावातील लोक देखील मोठ्या संख्येने दर्शनाला आणि येथील दृश्य पाहायला गर्दी करतात
नागरी सुविधा
जवळपासची गावे
टाकवे गावाच्या आसपास वाटेगाव, बांबवडे, पाचुंब्री, भैरववा डी, शिरशी इत्यादी गावे आहेत.