Jump to content

टाकळी बुद्रुक (जळगाव)

टाकळी बुद्रुक हे महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातले एक खेडे आहे. या गावातून गडद नदी(?) वाहते. गावाची लोकसंख्या २००० च्या आतच आहे. गावात शेळके, पाटील, महाजन आणि सोनावणे या आडनावाची माणसे प्रामुख्याने आहेत. सयाजी शेळके हा मोगलांचा एक इनामदार होता. त्याच्या नावावरून या खेड्याला ’सयाजीची टाकळी’असेही म्हणत. या गावात प्रवेश करण्यासाठी सात वाटा आहेत. गावातील लोक मुख्यत्वे शेतकरी आहेत. फारच थोडे व्यापारी आहेत. गावात महादेवाचे एक जुने मंदिर आहे.