Jump to content

टाइम्ड आऊट

टाईम्ड आउट हा क्रिकेटच्या खेळातील बाद होण्याचा प्रकार आहे.

क्रिकेटच्या नियमांतील नियम क्रमांक ३१ प्रमाणे एक फलंदाज बाद झाल्यावर दुसऱ्या फलंदाजाला त्याची जागा घेण्यासाठी साधारण तीन मिनिटे दिली जातात. जर तीन मिनिटात पुढच्या फलंदाजाने आपली खेळी सुरू नाही केली तर त्याला टाईम्ड आउट बाद घोषित केले जाते व त्याच्या पुढील फलंदाजाला मैदानात उतरण्याची संधी देण्यात येते.

पूर्वी टाईम्ड आउट न होण्यासाठी बाद होउन बाहेर चाललेला फलंदाज व नवीन फलंदाज यांनी सीमेच्या आत एकमेकांना ओलांडणे (क्रॉस करणे) आवश्यक होते.