टर्की पालन
टर्कीपालन हा टर्की या कोंबडी सारख्या मोठ्या पक्ष्याचे व्यावसायिक उत्पन्नासाठी केला जाणारा व्यवसाय आहे.
भारतामधील टर्कीच्या प्रजाती
बोर्ड ब्रेस् टेड ब्रॉन्झ
पिसांचा मूळ रंग किरमिजी नसून काळा असतो. मादीच्या छातीवर पांढरी टोके असलेली काळ्या रंगाची पिसे असतात, ज्यायोगे 12 आठवड्यांच्या वयातच लिंग निर्धारणात मदत होते.
बोर्ड ब्रेस्टेडव् हाइट
ही बोर्ड ब्रेस्टेड ब्रॉन्झ आणि पांढरी पिसे असलेली व्हाइट हॉलंड यांची संकर प्रजाती आहे.पांढरी पिसे असलेली टर्की ही भारतीय शेती-हवामान परिस्थितींना उपयुक्त असल्याचे आढळते कारण त्यांच्यात उच्च उष्णता सहन करण्याची क्षमता आहे तसेच स्वच्छता केल्यानंतर त्या सुरेख व स्वच्छ दिसतात.
बेल्ट्सव्हिले स्मॉल व्हाइट
बोर्ड ब्रेस्टेड व्हाइटशी साम्य असलेली ही टर्की आकाराने लहान असते. अंड्यांचे उत्पादन, प्रजनन आणि अंडी उबविण्याची उच्च क्षमता असून वजनी प्रजातींपेक्षा अंडी उबवून फोडण्याची क्षमता कमी असते.
नंदनाम टर्की
नंदनाम टर्की -1 प्रजाती काळ्या देशी आणि लहान पांढरी परदेशी बेल्टसव्हिले जातीची संकर आहे. ही तामिळनाडुच्या हवामानाच्या परिस्थितींसाठी उपयुक्त आहे.
टर्कीना पकडणे आणि हाताळणे
सर्व वयोगटातील टर्कींना छडीच्या सहाय्याने एका जागेतून दुसरीकडे सहजपणे घेऊन जाता येते. तुर्कींना पकडण्यासाठी अंधारलेली खोली/कक्ष चांगला असतो जेणे करून त्यांना इजा न करता दोन्ही पायांनी धरून पकडले जाऊ शकते. तथापि, प्रौढ तुर्कींना 3 ते 4 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लोंबकळत ठेवू नये.