Jump to content

टँजियर

टॅंजियर (अरबी:طنجة‎ टॅंजाह;बर्बर: ⵟⴰⵏⵊⴰ टांजा) हे मोरोक्कोच्या उत्तर भागातील एक शहर आहे. हे शहर जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीवर आफ्रिकेच्या किनाऱ्यावर टॅंजिरच्या आखाताकाठी असल्याने याला असाधारण भौगोलिक महत्त्व आहे.

येथे गेली २,५०० वर्षे सतत वस्ती असल्याची नोंद आहे. सध्याची येथील लोकसंख्या २०१२ च्या अंदाजानुसार ८,५०,००० आहे.