झुरळ
झुरळ एक लहान कीटक आहे. झुरळांच्या शरIरातून बाहेर पडणाऱ्या घातक घटकांमुळे डायरिया किंवा अन्नात विषबाधा होण्याची शक्यता असते. माणूस आणि इतर असंख्य प्राणी यांचे डोके धडापासून वेगळे झाले, की ते जागीच मरतात. झुरळे मात्र त्यांचे मुंडके तुटले तरी जवळपास एक महिनाभर जगू शकतात. झुरळाच्या शरीरात रक्तदाबाची संकल्पनाच नसते. त्यामुळे डोके उडाल्याने त्याला काही फरक पडत नाही. तसेच एकदा अन्न खाल्ले, की झुरळाला ते जवळपास महिनाभर पुरते. साहजिकच डोके उडाल्यावर सुद्धा ते कित्येक दिवस जगू शकते.
होणारे परिणाम
- अन्न दूषित होते -
झुरळे काहीही खाऊन जिवंत राहू शकतात. आपण खात असलेल्या साध्या अन्नापासून ते मृत वनस्पती, प्राणी व अगदी साबण, गम, पेपर, गळलेले केस यांवर देखील झुरळे जगू शकतात. रात्री फिरताना ते उघड्या अन्नावर मृत त्वचा, केस व अंड्याची कवचे टाकून त्यांना प्रदूषित करतात.
- विविध आजारांना आमंत्रण देतात -
झुरळांच्या आतड्यांमध्ये असलेल्या बॅक्टेरियांमुळे मूत्रमार्गात संसर्ग, पचनाचे विकार बळावण्याची शक्यता अधिक असते. झुरळे अन्नाजवळ फिरकल्याने त्याच्या लाळेतून काही बॅक्टेरिया जातात व त्यामुळे अन्न प्रदूषित होते.
- झुरळे चावू शकतात -
झुरळातील काही प्रजाती, मानावी शरीराचा चावादेखील घेऊ शकतात. झुरळाची ही प्रजात अपवादानेच आढळते. मात्र जर घरात अशाप्रकारचे झुरळ आढळल्यास विशेष काळजी घ्यावी. कारण शरीराच्या मऊ त्वचा असलेल्या भागात जसे की, बोटे,पायाचा अंगठा अशा जागी चावा घेतल्याने जखम होॅंण्याची शक्यता असते.
- शरीरात प्रवेश करतात -
झुरळे फक्त माणसाच्या अन्नातच नाही तर शरीरात देखील प्रवेश करू शकतात. अनेकदा झोपेत झुरळे नाकात किंवा कानात प्रवेश करतात. तर छोट्या आकाराची झुरळे, माणूस गाढ झोपेत असताना त्याच्या शरीरात थेट प्रवेश करू शकतात.
- अन्नात विषबाधा होते -
झुरळांमुळे अनेक बॅक्टेरिया अन्नात मिसळून विषबाधा किंवा टायफाईडचा प्रसार होण्याची शक्यता वाढते. विषबाधेच्या साथीमध्ये असे आढळून आले आहे की, जर झुरळांचा प्रादुर्भाव कमी झाला तर विषबाधेची समस्यादेखील आटोक्यात येण्यात मदत होते.
- अॅलर्जी -
झुरळांमुळे अॅलर्जी होण्याची शक्यता असते. त्यांच्या लाळेतून व शरिरावरून शेकडो प्रकारच्या अॅलर्जी होण्याची शक्यता असते. यामुळे त्वचेवर रॅशेस येणे, डोळ्यांतून पाणी येणे, सतत शिंका येणे अशी लक्षणे दिसू शकतात.
बाह्य दुवे
- अतुल कहाते, अच्युत गोडबोले. "चिवट झुरळ". 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २१ ऑगस्ट, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
संदर्भ
विनायक तांबे यांनी लिहिलेले साहित्य