झुमके
झुमके किंवा झुबे हा एक पारंपरिक दागिना आहे. हा कानामध्य़े घातला जातो. झुमका हा लोंबता व झुलणारा दागिना आहे. सोने, मोती, चांदी अशा विविध प्रकारात सुम्के उपलब्ध असतात. झुमक्याला वरील बाजू डडूल असतो व मध्य़े एक नाजूक साखळी असते व साखळी नंतर झुमका असतो, झुमका हा गोलाकार असतो व झुमक्य़ाला खाली नाजूक मणी असतात. हा प्रकार बहुतांशी स्त्रिया वापरतात.
झुबे हा एक पारंपरिक दागिना आहे. झुबा हा लोंबणारा व झुलणारा दागिना आहे. झुंबराप्रमाणे लटकणारा हा दागिना कानामध्ये घातला जातो. याचा आकार गोल असतो. वरील बाजुस गोलाकार फूल असते.ते सोन्याचे ,खड्याचे किंवा मोत्याचे असते. याला मागे छोटा दांडा असतो.तो कानाच्या छिद्रात घालतात.तिथे कानामागे त्याला फिरकी किंवा मळसूत्र असते,त्याच्या साह्याने झुबा कानावर बसवतात.त्याला जोडून मधे एक नाजुक साखळी असते व साखळीला खाली गोलाकार किंवा त्रिकोणी झुबा असतो. खाली नाजुक मणी असतात ते सोन्याचे किंवा मोत्याचे असतात. सोन्यामोत्याप्रमाणेच आजकाल सिल्व्हर आयोडाईज्ड ,रेशमी धाग्याचे किंवा पेपर क्विलिंगचे झुबे घालण्याची फॅशन आली आहे.झुब्याला झुमके असंही म्हणतात तर लहान मुलांच्या झुब्याला डूल म्हणतात . गळ्यातला लफ्फा आणि झुबे यांची नक्षी एकमेकांशी मिळती जुळती असते. नृत्य करताना विशिष्ट प्रकारचे झुबे घालतात.त्यांना मागे सोन्याचे किंवा मोत्याचे वेल जोडता येतात. चेहऱ्याभोवती मागे पुढे हलणारे झुबे एकूणच सौंदर्यात भरच घालतात.
चित्रदालन
- मोत्यांचे झुबे
- सोन्यचे झुबे