संघ | सा | वि | प | ब | अ | बोनस | गुण | नि.धा. |
---|---|---|---|---|---|---|---|---|
श्रीलंका | ४ | २ | १ | ० | १ | ० | ११ | +०.४८८ |
झिम्बाब्वे | ४ | १ | १ | १ | १ | ० | ८ | -१.०२० |
वेस्ट इंडीज | ४ | १ | २ | १ | ० | ० | ७ | +०.३१५ |
झिम्बाब्वे त्रिकोणी मालिका, २०१६-१७
झिम्बाब्वे त्रिकोणी मालिका, २०१६-१७ | ||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||||
संघ | ||||||||||
झिम्बाब्वे | श्रीलंका | वेस्ट इंडीज | ||||||||
संघनायक | ||||||||||
ग्रेम क्रेमर | उपुल तरंगा | जेसन होल्डर | ||||||||
सर्वात जास्त धावा | ||||||||||
सिकंदर रझा (१६३) | निरोशन डिक्वेल्ला (१७९) | एव्हिन लुईस (२०२) | ||||||||
सर्वात जास्त बळी | ||||||||||
शॉन विल्यम्स (४) | असेला गुणरत्ने (८) नुवान कुलशेखर (८) | जासन होल्डर (९) |
नोव्हेंबर २०१६ मध्ये झिम्बाब्वेमध्ये झिम्बाब्वे त्रिकोणी मालिका, २०१६-१७ ह्या एकदिवसीय मालिकेचे आयोजन करण्यात आले होते.[१][२] यजमान झिम्बाब्वे, श्रीलंका आणि वेस्टइंडीजच्या संघांदरम्यान ही स्पर्धा खेळवली गेली. मूलतः श्रीलंकेचा दोन कसोटी, तीन एकदिवसीय सामने आणि एक टी-२० सामन्यासाठी झिम्बाब्वे दौरा नियोजित होता. परंतू, एकदिवसीय आणि टी-२० या मालिकांऐवजी त्रिकोणी मालिका आयोजित करण्यात आली होती.[१] झिम्बाब्वेमधील मर्यादित षटकांच्या मालिकेमध्ये पहिल्यांदाचा डीआरएस तंत्रज्ञान वापरले गेले.[३] श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेमधील दुसऱ्या कसोटीनंतर लगेच ह्या त्रिकोणी मालिकेमध्ये सदर तंत्रज्ञानाचा वापर केला गेला.[३]
श्रीलंकेने अंतिम सामन्यात झिम्बाब्वेला ६ गडी राखून हरवले आणि स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले.[४]
संघ
झिम्बाब्वे[५] | श्रीलंका[६] | वेस्ट इंडीज[७] |
---|---|---|
|
|
|
- मार्लोन सॅम्युएल्स आणि अल्झारी जोसेफच्या ऐवजी शेन डाउरिच आणि मिगेल कमिन्सची निवड करण्यात आली.[८]
- डॅरेन ब्राव्होने ट्विटरवर काढलेल्या उद्गारांवर हरकत घेउन वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाने त्याला वगळले आणि त्याऐवजी जेसन मोहम्मदची निवड केली.[९]
- सुनील नारायणने व्यक्तिगत कारणाने संघातून माघार घेतली व त्याऐवजी देवेन्द्र बिशूला संघात घेतले गेले.[९]
गुणतक्ता
अंतिम सामन्यासाठी पात्र
स्त्रोत: इएसपीन क्रिकइन्फो
साखळी सामने
१ला सामना
झिम्बाब्वे १५४ (४१.३ षटके) | वि | श्रीलंका १५५/२ (२४.३ षटके) |
- नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी
- एकदिवसीय पदार्पण: असेला गुणरत्ने (श्री) आणि कार्ल मुंबा (झि).
- उपुल तरंगाचा (श्री) एकदिवसीय कर्णधार म्हणून पहिलाच सामना.[१०]
- गुण: श्रीलंका - ५, झिम्बाब्वे - ०.
२रा सामना
वेस्ट इंडीज २२७ (४९.२ षटके) | वि | श्रीलंका १६५ (४३.१ षटके) |
जोनाथन कार्टर ५४ (६२) नुवान कुलशेखर २/३७ (१० षटके) | सचित पतिराना ४५ (४०) शॅनन गॅब्रिएल ३/३१ (८.१ षटके) |
- नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी
- एकदिवसीय पदार्पण: शई होप, ॲशले नर्स आणि रोव्हमन पॉवेल(वे)
- गुण: वेस्ट इंडीज - ५, श्रीलंका - ०.
३रा सामना
झिम्बाब्वे २५७ (५० षटके) | वि | वेस्ट इंडीज २५७/८ (५० षटके) |
क्रेग एर्विन ९२ (१००) कार्लोस ब्रेथवेट ४/४८ (१० षटके) |
४था सामना
झिम्बाब्वे ५५/२ (१३.३ षटके) | वि | श्रीलंका |
क्रेग एर्विन २३* (३०) नुवान कुलशेखर १/१७ (५ षटके) |
- नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी.
- झिम्बाब्वेच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे सामना थांबवण्यात आला आणि पुढील खेळ रद्द करण्यात आला.[१३]
- गुण: झिम्बाब्वे - २, श्रीलंका - २.
५वा सामना
श्रीलंका ३३०/७ (५० षटके) | वि | वेस्ट इंडीज ३२९/९ (५० षटके) |
एव्हिन लुईस १४८ (१२२) सुरंगा लकमल २/६७ (१० षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
- एव्हिन लुईसचे (वे) पहिले एकदिवसीय शतक.[१४]
- गुण: श्रीलंका - ४, वेस्ट इंडीज - ०.
६वा सामना
झिम्बाब्वे २१८/८ (४९ षटके) | वि | वेस्ट इंडीज १२४/५ (२७.३ षटके) |
- नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी
- झिम्बाब्वेच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे एका षटकाचा खेळ कमी करण्यात आला.
- वेस्ट इंडीजच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे खेळ थांबविण्यात आला.
- गुण: झिम्बाब्वे - ४, वेस्ट इंडीज - ०
अंतिम सामना
झिम्बाब्वे १६० (३६.३ षटके) | वि | श्रीलंका १६६/४ (३७.३ षटके) |
कुशल मेंडिस ५७ (७२) ब्रायन व्हिटोरी ३/५२ (९ षटके) |
- नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी
- एकदिवसीय पदार्पण: तरीसाई मुसाकांडा (झि)
संदर्भ आणि नोंदी
- ^ a b "श्रीलंका कसोटीमालिकासाठी आणि वेस्ट इंडीज त्रिकोणीमालिकेसाठी झिम्बाब्वे यजमान". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २९ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "श्रीलंका, वेस्टइंडीजचे यजमानपद झिम्बाब्वेकडे". क्रिक टोटल. १० ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ a b "झिम्बाब्वे क्रिकेट डीआरएस वापरण्यास सज्ज". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "मेंडीस, तरंगा स्टीअर्स श्रीलंका टू टायटल". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "त्रिकोणी मालिकेसाठी झिम्बाब्वे संघात मुसाकान्दा, मुंबा ह्या नव्या चेहर्यांचा समावेश". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "त्रिकोणीमालिकेसाठी तरंगा श्रीलंकेचा कर्णधार". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "झिम्बाब्वे त्रिकोणी मालिकेसाठी वेस्ट इंडीज संघात होप आणि पॉवेल". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "वेस्ट इंडीजच्या नव्या संघात डाउरिचची निवड, सॅम्युएल्सला वगळले". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ a b "झिम्बाब्वे त्रिकोणी-मालिकेमधून डॅरेन ब्राव्होला मायदेशी परत पाठवले". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "श्रीलंकेची गोलंदाजी, मुंबाचे एकदिवसीय पदार्पण". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "पहिल्या शतकाने होपा थोडासा दिलासा". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "शेवटच्या षटकात तीन धावा देऊन झिम्बाब्वेने बरोबरी केली". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "मुसळधार पाऊस आणि ओल्या मैदानामुळे सामना रद्द". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "लुईसच्या १४८ धावांनंतरही रोमहर्षक सामन्यात श्रीलंकेचा बचाव". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.