झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२०-२१
झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२०-२१ | |||||
पाकिस्तान | झिम्बाब्वे | ||||
तारीख | ३० ऑक्टोबर – १० नोव्हेंबर २०२० | ||||
संघनायक | बाबर आझम | चामु चिभाभा | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | बाबर आझम (२२१) | ब्रेंडन टेलर (२०४) | |||
सर्वाधिक बळी | मोहम्मद हसनैन (५) इफ्तिकार अहमद (५) वहाब रियाझ (५) शहीन अफ्रिदी (५) | ब्लेसिंग मुझाराबानी (७) | |||
मालिकावीर | बाबर आझम (पाकिस्तान) | ||||
२०-२० मालिका |
झिम्बाब्वे क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० मध्ये पाकिस्तानचा दौरा केला. दौऱ्यातील एकदिवसीय सामने हे २०२३ क्रिकेट विश्वचषकाच्या कसोटी देशांच्या पात्रतेच्या २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळविण्यात आले. नियोजित वेळापत्रकानुसार ट्वेंटी२० सामने लाहोरमधील गद्दाफी मैदानावर खेळवले जाणार होते परंतु लाहोर मध्ये वाढते प्रदुषण आणि जीववायुचा ढासळता स्तर यामुळे ट्वेंटी२० सामने रावळपिंडीला हलविण्यात आले. त्यामुळे सर्व सामने हे रावळपिंडीतील रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळविण्यात आले. २०१५ नंतर प्रथमच झिम्बाब्वेनी पाकिस्तानचा दौरा केला.
पाकिस्तानने पहिले दोन एकदिवसीय सामने जिंकत मालिका जिंकलीच होती परंतु शेवटचा एकदिवसीय सामना बरोबरीत सुटला आणि झिम्बाब्वेने तो सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकला. त्यामुळे पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली. झिम्बाब्वेचा पाकिस्तानवर एकदिवसीय सामन्यात १९९८-९९ नंतरचा हा पहिलाच विजय आहे.
२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
पाकिस्तान २८१/८ (५० षटके) | वि | झिम्बाब्वे २५५ (४९.४ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
- हॅरीस रौफ (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- विश्वचषक सुपर लीग गुण : पाकिस्तान - १०, झिम्बाब्वे - ०.
२रा सामना
झिम्बाब्वे २०६ (४५.१ षटके) | वि | पाकिस्तान २०८/४ (३५.२ षटके) |
- नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी.
- हैदर अली आणि मोहम्मद मुसा (पाक) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- विश्वचषक सुपर लीग गुण : पाकिस्तान - १०, झिम्बाब्वे - ०.
३रा सामना
झिम्बाब्वे २७८/६ (५० षटके) | वि | पाकिस्तान २७८/९ (५० षटके) |
- नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी.
- खुशदिल शाह (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले
- विश्वचषक सुपर लीग गुण : झिम्बाब्वे - १०, पाकिस्तान - ०.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला सामना
झिम्बाब्वे १५६/६ (२० षटके) | वि | पाकिस्तान १५७/४ (१८.५ षटके) |
- नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी.
- उस्मान कादिर (पाक) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
झिम्बाब्वे १३४/७ (२० षटके) | वि | पाकिस्तान १३७/२ (१५.१ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
३रा सामना
झिम्बाब्वे १२९/९ (२० षटके) | वि | पाकिस्तान १३०/२ (१५.२ षटके) |
चामु चिभाभा ३१ (२८) उस्मान कादिर ४/१३ (४ षटके) |
- नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी.
- अब्दुल्ला शफिक (पाक), फराज अक्रम आणि मिल्टन शुंबा (झि) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.