झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा अफगाणिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०२०-२१
झिम्बाब्वे क्रिकेट संघ अफगाणिस्तानविरुद्ध संयुक्त अरब अमिरातीमध्ये, २०२०-२१ | |||||
अफगाणिस्तान | झिम्बाब्वे | ||||
तारीख | २ – २० मार्च २०२१ | ||||
संघनायक | असघर अफगाण | शॉन विल्यम्स | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | हश्मातुल्लाह शहिदी (२१५) | शॉन विल्यम्स (२६४) | |||
सर्वाधिक बळी | रशीद खान (११) | ब्लेसिंग मुझाराबानी (८) | |||
मालिकावीर | शॉन विल्यम्स (झिम्बाब्वे) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | अफगाणिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रहमानुल्लाह गुरबाझ (११४) | रायन बर्ल (८१) | |||
सर्वाधिक बळी | रशीद खान (६) | ब्लेसिंग मुझाराबानी (६) | |||
मालिकावीर | करीम जनत (अफगाणिस्तान) |
झिम्बाब्वे क्रिकेट संघाने अफगाणिस्तानविरुद्ध दोन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी मार्च २०२१ मध्ये संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला. अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे या दोन देशांनी एकमेकांविरुद्ध पहिल्यांदाच कसोटी सामना खेळला. नियोजनानुसार ही मालिका ओमानमध्ये आयोजित केली होती. परंतु जानेवारी २०२१ मध्ये अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने ही मालिका संयुक्त अरब अमिरातीला हलविली.
सर्व सामने हे अबु धाबीच्या शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळविण्यात आले. कसोटी मालिकेतील पहिली कसोटी झिम्बाब्वेने १० गडी राखत जिंकली. झिम्बाब्वेने शेवटचा कसोटी सामना हा नोव्हेंबर २०१८मध्ये बांगलादेशविरुद्ध जिंकला होता. पुनरागमन करत अफगाणिस्तानने दुसरी कसोटी जिंकून कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. दुसऱ्या कसोटीत हश्मातुल्लाह शहिदी याने द्विशतक झळकवले. कसोटीत द्विशतक ठोकणारा शहिदी हा अफगाणिस्तानचा पहिला खेळाडू ठरला.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका अफगाणिस्तानने ३-० अशी जिंकली.
सराव सामने
तीन-दिवसीय सामना: अफगाणिस्तान अ वि झिम्बाब्वे
कसोटी मालिका
१ली कसोटी
२-६ मार्च २०२१ धावफलक |
अफगाणिस्तान | वि | झिम्बाब्वे |
- नाणेफेक: अफगाणिस्तान, फलंदाजी.
- अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे या दोन देशांमधला पहिला कसोटी सामना.
- मुनीर अहमद, अब्दुल मलिक, अब्दुल वसी (अ) आणि वेस्ले मढीवेरे (झि) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- झिम्बाब्वेने कसोटीत अफगाणिस्तानवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
२री कसोटी
१०-१४ मार्च २०२१ धावफलक |
अफगाणिस्तान | वि | झिम्बाब्वे |
- नाणेफेक: अफगाणिस्तान, फलंदाजी.
- शहीदुल्लाह आणि सय्यद शिर्जाद (अ) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- अफगाणिस्तानने कसोटीत झिम्बाब्वेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला सामना
अफगाणिस्तान १९८/५ (२० षटके) | वि | झिम्बाब्वे १५०/७ (२० षटके) |
तिनाशे कामुनहुकाम्वे ४४ (३७) रशीद खान ३/२८ (४ षटके) |
- नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
२रा सामना
१९ मार्च २०२१ धावफलक |
अफगाणिस्तान १९३/५ (२० षटके) | वि | झिम्बाब्वे १४८ (१७.१ षटके) |
रायन बर्ल ४० (२९) रशीद खान ३/३० (३ षटके) |
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
२रा सामना
२० मार्च २०२१ धावफलक |
अफगाणिस्तान १८३/७ (२० षटके) | वि | झिम्बाब्वे १३६/५ (२० षटके) |
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
- फझलहक फारूखी (अ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.